Nagpanchami Google
अहिल्यानगर

अहमदनगर : ऐन नागपंचमी यात्रा महोत्सवात नागेश्वर मंदिरात चोरी

गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. नगर) : तालुक्यातील खानापूर येथील ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात नागपंचमी यात्रा महोत्सव दरम्यान, आज (शुक्रवारी) रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यानंतर भाविक व ग्रामस्थांनी आज सकाळी मंदिरासमोर एकत्र येत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच चोरट्यांचा तात्काळ तपास लावण्याची मागणी केली

गोदावरी नदीच्या काठावर खानापूर येथे पुरातन नागेश्वर मंदिर असून ग्रामदैवत मंदिराचे जिर्णोद्धार करण्याचे काम लोकवर्गणीतून टप्प्याटप्याने सुरु आहे. मागील आठवड्यात श्रीगणेश, नागेश्वर (मुख्य) व भगवान शंकराचे मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली. नागपंचमीच्या दिवशी पंचक्रोशीतील गावांसह जिल्हाभरातील भाविक मंदीरात दर्शनासाठी येतात. नागपंचमीच्या पुर्व संध्येला भाविक मंदिराची साफसफाई करुन विद्युत रोषणाई करतात. रात्रीच्या सुमारास भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दरवर्षी प्रमाणे ग्रामस्थ व भजनी मंडळांनी रात्री एक वाजेपर्यंत भजन करून घरी परतले.

त्यानंतर भुरट्या चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मंदीरात प्रवेश करून मंदिरातील अत्याधुनिक सांऊड सिस्टीम एप्लीफायर मशिनसह चोरून नेली. त्याची किंमत सुमारे ४५ हजार रुपये असून पहाटे पुजारी विठ्ठल म्हस्के मुर्तीस्नान पुजेसाठी पहाटे मंदीरात आले, तेव्हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलीस पाटील संजय आदिक यांनी तालुका पोलीस ठाण्यास जाऊन तातडीने खबर दिली. गावातील विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर येवून चोरीच्या घटनेचा निषेध करुन पोलीसांनी तात्काळ तपास करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT