Theft at the house of former mayor Sandeep Kotkar 
अहिल्यानगर

चोरी आणि तीही केडगावातील कोतकरांच्या घरी

सकाळ वृत्तसेवा

नगर : कोतकर कुटुंबाची शेती आणि निवासस्थान आहे. तेथे नेहमी कार्यकर्त्यांची वर्दळ असते. नोकरचाकरही असतात. तरीही चोरी झाल्याने पोलिसांना आव्हान निर्माण झाले आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांचा एकनाथ नगर (केडगाव) येथील बंगल्याच्या मुख्य दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून चोरांनी तीन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

ही घटना बुधवारी रात्री घडली. कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

या बाबत सुरेखा भानुदास कोतकर (रा. एकनाथ नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले, बुधवारी रात्री कोतकर कुटुंब घरात झोपले असता रात्री अकारा वाजता घरात आवाज येत असल्याची माहिती सुरेखा कोतकर यांना मिळाली.

त्यांनी तत्काळ गेटवरील वॉचमनला आवाज दिला. त्यावेळी घराच्या पाठीमागून कोणी तरी पळाल्याचा आवाज आला. त्यानंतर घराची पाहणी केली असता बेड रूमधील कपाटाचे लॉक तुटलेले आढळून आले. त्यातील सोन्याचे चांदीचे दागिने व रोकड असा तीन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लाबविला.

सहायक पोलिस निरीक्षक रणदिवे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT