आव्हाडवाडीत फौजदाराचं गाव ई सकाळ
अहिल्यानगर

वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

सकाळ डिजिटल टीम

तिसगाव : नगर तालुक्‍यातील गर्भगिरी डोंगराच्या कुशीत पांढरीपूल-करंजी रस्त्यावर असलेलं छोटसं गाव म्हणजे आव्हाडवाडी. जेमतेम 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या या गावाने "फौजदारांचे गाव' ही आपली नवी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली आहे. गावातील 16 जण फौजदार आहेत. महाराष्ट्र व केंद्रीय शासकीय सेवेत वर्ग-1 अधिकारी म्हणून 14 जण सेवेत आहेत. २७जण पोलिस दलात अंमलदार आहेत.

गाव तसे दुष्काळी. अल्प प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतीतून अत्यल्प उत्पन्न मिळते. त्यामुळे येथील मुलांसमोर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नगर शहर जेमतेम 25 किलोमीटर अंतरावर असल्याने, येथील सर्व तरुण शिक्षणासाठी धडपडत आहेत. शासकीय सेवेत जाण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत.

सुरवातीला गावातील पहिले प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्ञानदेव आव्हाड हे विक्रीकर आयुक्त म्हणून शासकीय सेवेत दाखल झाले. त्यानंतर विक्रम आव्हाड जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून, धर्मनाथ आव्हाड विक्रीकर आयुक्त, लक्ष्मण आव्हाड, रामकृष्ण आव्हाड, बाबाजी आव्हाड हे पोलिस उपअधीक्षक, महादेव आव्हाड, प्रा. लक्ष्मण आव्हाड वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी रुजू झाले. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.

सध्या गावातील 27पेक्षा जास्त तरुण पोलिस अंमलदार म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. तसेच विविध शासकीय कार्यालयांतही अनेक तरुण नोकरी करीत आहेत. शासकीय सेवेत असलेल्या तरुणांनी एकत्र येत गावात अत्याधुनिक वाचनालय सुरू केले आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी स्वेच्छेने वाचनालयासाठी योगदान देत आहेत. 80 टक्के लोक वारकरी संप्रदायाला मानणारे असल्याने, गावात अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातही गाव आघाडीवर असते, असे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे यांनी सांगितले.

आजूबाजूची सर्व गावे आज आमच्या गावाकडे आदर्श गाव म्हणून पाहत आहेत. कित्येक तरुण आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून, कष्टाशिवाय पर्याय नसल्याची जाणीव करून देतो.

- प्रशांत आंधळे, सहायक पोलिस निरीक्षक, ठाणे

गावातील तरुण स्वकर्तृत्वावर मोठे झाल्यानंतरही गावाला विसरलेले नाहीत. गावाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असतात. यात्रा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांत आनंदाने सहभागी होतात. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

- अंकुश आव्हाड, सरपंच, आव्हाडवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन T20 World Cup, २ कसोटी वर्ल्ड कप फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी अन् वन डे वर्ल्ड कप...; ICC च्या बैठकीत बऱ्याच हालचाली

Pune Tunnel Project: पुणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शहरात ३१ किलोमीटरचे भुयारी मार्ग; पुरंदर विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी

Radhanagari Wildlife Sanctuary : मांजरखिंड ते काळम्मावाडी धरण मार्गावर खुललं निसर्गाचं सौंदर्य; झाडांवर रुबाबात वावरणारा 'शेकरू' कॅमेऱ्यात कैद

Latest Marathi News Live Update : हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा बर्फवृष्टी सुरू

Gold Rate Today : सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

SCROLL FOR NEXT