Sugarcane esakal
अहिल्यानगर

ऊस झाला भरपूर, साखर कुठे ठेवू ?

गाळपापेक्षा अतिरिक्त ऊसलागवड ; साखरेच्या दराचे कारखान्यांना कोडे

मुरलीधर कराळे

अहमदनगर : जिल्ह्यातील कारखान्यांना या वर्षी गळीत हंगामासाठी पुरेसा ऊस उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात एक लाख 30 हजार 805 हेक्टरवर ऊसलागवड झाल्याची कारखान्यांकडे नोंद आहे. याव्यतिरिक्त काही क्षेत्र उसाचे आहे. त्यामुळे या वर्षी सुरू राहणाऱ्या 22 कारखान्यांना उसाची टंचाई भासणार नाही. उलट, कारखान्यांकडे ऑगस्टपर्यंत तब्बल 6 लाख 4 हजार 124.60 टन साखर शिल्लक आहे.या वर्षी जिल्ह्यातील 23 पैकी 22 कारखान्यांचे गाळप होणार आहे. यापूर्वी अनेकदा ऊस शिल्लक नसल्याने गाळप पूर्ण होत नसे.

दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले असल्याने ऊस मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून साखरेला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे कारखाने अडचणीत आहेत. त्यामुळे कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉलची निर्मिती करावी, असे सरकारचे आदेश आहेत. त्यासाठी आवश्यक त्या योजनाही सुरू करण्यात आल्या. काही कारखान्यांनी इथेनॉल तयार करण्याचे प्रकल्प सुरू केले. आता ऊस जास्त असल्याने कारखान्यांना उसाची अडचण नाही, परंतु जास्त ऊस होणार आहे. नोंदणी नसलेला ऊस कोणत्या कारखान्यास द्यायचा, असा प्रश्नही काही शेतकऱ्यांना पडणार आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यास या वर्षी उसाची उपलब्धता भरपूर आहे. त्यामुळे गाळप पूर्ण क्षमतेने होऊ शकते. बहुतेक कारखान्यांनी गाळपाची तयारी केली आहे. तसे परवाने घेतले जात आहेत. त्यामुळे साखरेचे उत्पादनही भरपूर होणार आहे. साखरनिर्मितीबरोबरच इथेनॉलनिर्मितीसाठी कारखाने सरसावले आहेत.

- मिलिंद भालेराव, प्रादेशिक सहसंचालक (साखर)

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाल्याने पाणीपातळीही वाढत आहे. उसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. कारखान्यांनी नोंदणी केलेल्या उसाबरोबरच इतर क्षेत्रावरही उसाची लागवड झालेली आहे.

- शिवाजी जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : मोदी सरकारचे काम चांगले, पेपरफुटीविरोधी विधेयकावर सोनम वांगचुक खूश; विध्यार्थ्यांवरील कारवाईवरही बोलले

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेला वेग! 2027 च्या अंतराळ मोहिमेसाठी इस्रोची मोठी तयारी, अंतराळवीर अवकाशात झेप घ्यायला सज्ज

Akola News: अकोल्यात 'शोले स्टाईल' आंदोलन! सीईटी-एमपीएससी कथित पेपरफुटीवर संताप; जलकुंभावर चढून युवक काँग्रेसचा सरकारला इशारा

Latest Marathi News Live Update : रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड

High Court Judgment: उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! सज्ञान युवतीला आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार; पतीसोबत राहण्याची इच्छा मान्य

SCROLL FOR NEXT