'They' created an innovative 'model' of Kandachali 
अहिल्यानगर

'त्यांनी' तयार केले कांदाचाळीचे अभिनव "मॉडेल' 

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : तालुक्‍यातील शेडगाव येथील शेतकरी दादासाहेब मेहेत्रे यांनी उभारलेली आधुनिक कांदाचाळ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाली आहे. खुद्द कृषी सचिवांनी या प्रयोगाची दखल घेतली आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही कौतुक केले. विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कांदापैदासकार व्ही. आर. जोशी, अभियंता व्ही. एस. भुतकर यांनी आज या चाळीची पाहणी केली. 

मेहेत्रे यांनी कल्पकतेने तयार केलेली कांदाचाळ पाहून शास्त्रज्ञांनी त्यांचे कौतुक केले. हा अभिनव प्रयोग प्रमाण मानून विद्यापीठांमध्ये या कांदाचाळीवर संशोधन होणार आहे, असे जोशी यांनी सांगितले. मेहेत्रे यांना विद्यापीठातील भेटीचे निमंत्रणही त्यांनी दिले. पुढील आठवड्यात शेतकरी व शास्त्रज्ञांची बैठक होऊन याबाबत पुढील दिशा ठरणार आहे. 

तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी या कांदाचाळीची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला कळविली होती. कृषी पर्यवेक्षक संदीप बोदगे यांनी सांगितले, की या नावीन्यपूर्ण प्रयोगाची राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दखल घेऊन त्याची माहिती घेण्याची सूचना शास्त्रज्ञांना केली होती. 

अशी आहे मेहेत्रे यांची कांदाचाळ 
मेहेत्रे यांनी या कांदाचाळीत एक्‍झॉस्ट फॅनचा वापर केला आहे. सच्छिद्र पाइपचे नेटवर्क वापरले आहे. एक्‍झॉस्ट फॅनमुळे चाळीमधील गरम हवा बाहेर फेकली जाते आणि वातावरणातील हवा कांदाचाळीमध्ये राहते. त्यामुळे कांदा सडत नाही. ही कांदाचाळ जमिनीवर उभारली असून, ती शेतकऱ्याला सोयीनुसार हलवता येते. पारंपरिक कांदाचाळीमध्ये शेतकऱ्याचा स्टीलवर जास्त खर्च होतो. त्यामध्ये काटकसर करून, कमी खर्चात ही कांदाचाळ तयार केली आहे. सद्यःस्थितीत शासकीय आराखड्यानुसार कांदाचाळ उभारणीसाठी प्रतिटन सात हजार रुपये खर्च येतो. मेहेत्रे यांच्या या मॉडेलसाठी प्रतिटन साडेतीन हजार रुपये खर्च आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT