Thieves esakal
अहिल्यानगर

श्रीरामपूर तालुक्यात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ

गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील खोकरसह भोकर शिवारातुन मळणी केलेला सोयाबीन चोरी गेल्याचा प्रकार नुकताच उघकीस आला आहे.

२५ क्विंटल सोयबीनसह कृषीपंप, केबल व स्प्रिंकलर चोरीला

प्रवरा नदी परिसरातील कान्हेगाव येथून तुषार संचाचे (स्प्रिंकलरचे) नऊ गण चोरी गेल्याची घटना ताजी आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांनी खोकरसह भोकर येथील पत्र्याच्या शेडचे कुलुप तोडून तसेच जाळी उचकटून सुमारे एक लाख रुपयांची सोयाबीन चोरुन नेली. खोकर-फाटा परिसरातील संदिप खलाटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडचे रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून मळणी केलेली गोण्यामध्ये भरून ठेवलेली सुमारे १२ क्विंटल सोयबीनसह तीन हजार रुपयांची थ्री-फेज केबल व तीन हजार रुपयांची कृषीपंप असा एकुण ५४ हजार रुपयांचा ऐवज रविवारी (ता. २४) चोरुन नेला. खलाटे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीसांनी दिली. तसेच मागील आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास खोकर-टाकळीभान रस्ता परिसरातील शंतनु दंडवते यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये मळणी करुन गोण्यामध्ये भरुन ठेवलेली सुमारे १३ क्विंटल सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ताजी आहे.

दुसर्‍या दिवशी शैलेश दंडवते शेतात गेल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दंडवते यांनी याबाबत तालुका पोलीसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक फौजदार शरद गायमुखे यांनी घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. मात्र यासंदर्भात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला. नसल्याने शेतकरी वर्गातुन संताप व्यक्त होत आहे. तीन महिण्यापुर्वी दंडवते यांच्या पत्र्याच्या शेडमधून गहु भरलेल्या पाच गोण्या चोरी गेल्याचा प्रकार घडल्याची माहिती त्यांंनी दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील भुरट्या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी भाजपाचे पदाधिकारी सदाशिव पटारे यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, तालुक्यातील कान्हेगाव शिवारातुन अरविंद खरात यांच्या शेतीतील तुषार संचाचे (स्प्रिंकलरचे) नऊ गण चोरी गेल्याची घटना ताजी आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. असुन तालुका पोलीस पथक अधिक करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT