Thousands of liters of water were wasted near Jayakwadi Dam near the rural hospital.jpg
Thousands of liters of water were wasted near Jayakwadi Dam near the rural hospital.jpg 
अहमदनगर

जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह तुटला; 24 गावांना पाणी फटका

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : जायकवाडी धरणातून शहराटकळी व 24 गावांना पाणी पुरवठा होणा-या योजनेच्या जलवाहिनीवर ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या एअर व्हॉल्व्ह तुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. गेल्या काही दिवसापासून एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती केली नसल्याने वारंवार असे प्रकार घडल्याने संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळयात पाणी टंचाईचा फटका बसतो.
 
जायकवाडी धरणातील क-हेटाकळी शिवारातून शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी व 24 गावांना पाणी पुरवठा होतो. राक्षी येथील पंपहाऊसवरुन योजनेतील शहरटाकळी, भातकुडगाव, ढोरजळगाव, आखातवाडे या गावांना गेवराई रस्त्याच्या बाजूने जाणा-या जलवाहिनीवर जागोजागी एअर व्हॉल्व्ह काढण्यात आलेले आहेत. ग्रामीण रुग्णालयाजवळील एअर व्हॉल्व्हचा वरील भाग गेल्या काही दिवसापासून तुटलेला आहे. तो पाईप लाकूड टाकून तात्पुरत्या स्वरुपात बंद केलेला आहे. मात्र गेवराई रस्ता परिसरातील ग्रामीण रुग्णालय, सोनामियाँ वस्ती, देहाडराय नगर येथील नागरीकांना उन्हाळयात वेळेवर पाणी मिळत नसल्याने ते एअर व्हॉल्व्हमधील लाकूड काढून पाणी भरतात. त्यामुळे वारंवार हजारो लीटर पाण्याची नासाडी होते.
 
आता उन्हाळयाची चाहूल लागली असून गावोगावी पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत आज सोमवार (ता.8) रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास एअर व्हॉल्व्हमधून लाकूड काढल्याने जोराच्या दाबाने पाणी वाहू लागले. त्यातून हजारो लिटर पाणी वाया गेले. योजनेचे काम पाहणा-या ज्ञानेश्वर संयुक्त पाणी पुरवठा समितीस याबाबत कल्पना दिल्यानंतर ते पाणी उशीरा बंद करण्यात आले. तोपर्यंत वाया गेलेल्या पाण्यामुळे संबंधीत गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. एअर व्हॉल्व्हची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी संबंधित गावातील नागरीकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT