Three days public curfew in Kolhar Bhagwatipur 
अहिल्यानगर

कोल्हार भगवतीपूरमध्ये तीन दिवस जनता कर्फ्यू

सुहास वैद्य

कोल्हार : मागील काही दिवसांपासून गावात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता, कोल्हार भगवतीपूर गावामध्ये 26 ते 28 मार्च असा तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांचीही मदत घेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ऍड. सुरेंद्र खर्डे 
यांनी सांगितले. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हार, भवतीपूर ग्रामपंचायती, आरोग्यविभाग व व्यापाऱ्यांची आज तातडीची बैठक घेण्यात आली. तीत कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेवून जनता कर्फ्यूचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 

बैठकीला कोल्हारच्या सरपंच निवेदिता बोरुडे, भगवतीपूरचे सरपंच दत्तू राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप, व्यापारी संघटनेचे 
अध्यक्ष सुधीर खर्डे, उपाध्यक्ष अनिल बांगरे, संजय शिंगवी, गोरक्षनाथ खर्डे, अमोल खर्डे, दिनकर खर्डे, श्रीकांत बेद्रे, अरुण निबे, शिवाजी निकुंभ, शिवकुमार जंगम, पप्पू मोरे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

ऍड. खर्डे यांनी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन केल्यास जागेवर दंड करण्यात येईल, असा इशारा दिला. 

डॉ. संजय घोलप यांनी रुग्ण वाढत असल्याने बेड मिळणे अवघड झाले आहे. जे निकषात बसतात, त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, या त्रिसूत्रीचा वापर करावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT