Three houses in Thackeray settlement were burnt down 
अहिल्यानगर

ठाकर वस्तीवरील तीन घरे जळाली, संसार उघड्यावर

शांताराम काळे

अकोले : तालुक्‍यातील कोंभाळणे शिवारातील ठाकर वस्तीवरील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यात मोटरसायकल, पैसे, धान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. काल (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

कोंभाळणे शिवारातील ठाकर वस्तीवर युवराज गावंडे, सुनीता गावंडे, सखाराम गावंडे, सखूबाई गावंडे या चौघांची कुटुंबे राहतात. ही कुटुंबे कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यांच्या घरांना आग लागली. त्याची माहिती मिळताच कुटुंबे घटनास्थळी आली, तसेच आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील चाळीस पोती धान्य, पैसे, मोटारसायकल, कागदपत्रे, शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. जळते घर उघड्या डोळ्यांनी पाहताना या कुटुंबांचे अश्रू अनावर झाले. 

घरात झोपलेल्या दोन वर्षांच्या मुलास सखूबाई गावंडे यांनी आगीतून बाहेर काढले. त्यामुळे अनर्थ टळला. घटनेची माहिती कळताच तहसीलदार मुकेश कांबळे यांनी मंडलाधिकारी कुलकर्णी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. माजी आमदार वैभव पिचड यांनी पीडितांना मदत देण्याची मागणी केली. अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT