Murder esakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime News : तिहेरी हत्याकांडाने नगर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, तीन जण गंभीर

रोहित कणसे

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ एका गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हदरला असून या हत्याकांडानंतर पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी जवळ सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक महितीनुसार जावयाने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासू अशा तिघांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. तर या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. दरम्यान कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी संशयित सुरेश निकम याला पोलीसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान शिर्डी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver 2026 : : जळगावच्या 45 हजार शेतकऱ्यांचे नशीब फळफळणार! सरकारने मागवली माहिती; शेतकरी कर्ज निवारण योजनेचा असा होणार फायदा!

Pune Accident: पिकअप व बोलोरोच्या धडकेत एक ठार, 9 गंभीर जखमी; अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील घटना, अंधारात काय घडलं!

Kagal Check Post Accidents: कागलमध्ये नाक्यावर अपघातांची मालिका, चेक पोस्ट व्यवस्थापनाचे दुर्लक्ष; बॅरिकेडस्‌मुळेच अनेक अपघात

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

South Africa vs West Indies: दक्षिण आफ्रिका वेस्ट विंडीज लढत भारतासाठीही महत्त्वाची; उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना

SCROLL FOR NEXT