Bay of Bengal Low Pressure Area : राज्यात थंडीची चाहूल पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात निचांकी ११.३ अंश तापमानाची नोंद

Maharashtra Minimum Temperature : राज्यात थंडीची चाहूल लागली असून किमान तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्रात ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
Bay of Bengal Low Pressure Area

Bay of Bengal Low Pressure Area

esakal

Updated on: 

Cold Weather in Maharashtra : नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहूल जाणवायला सुरू होते. परंतु, यंदा राज्यातील उन्हाचा चटका कमी होण्याची चिन्हे नाहीत. मात्र, पहाटेच्या तापमानात सातत्याने घट होत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचा कडाका, असे दुहेरी हवामान अनुभवायला मिळत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत किमान तापमान १५ अंशांच्या खाली घसरल्याने थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे. निफाडमध्ये राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...