Three youths commit suicide in Sangamnera on the same day 
अहिल्यानगर

संगमनेरात एकाच दिवशी तीन तरूणांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः शहर व तालुक्‍यातील तीन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनांमुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. शहरालगतच्या ढोलेवाडी, इंदिरानगर व तालुक्‍यातील हिवरगाव पठार येथील शेंडगेवाडी येथील युवकांचा समावेश आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी ः ढोलेवाडी येथील वैभव दत्तात्रेय पाबळे (वय 22) याने रविवारी (ता. 13) रात्री साडेआठपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीमुळे, त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दुसऱ्या घटनेत शहरातील इंदिरानगर भागातील गोपाल लालबहादूर थापा (वय 19, मूळ रा. नाशिक) या युवकाने रविवारी मध्यरात्री घराच्या छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दोन्ही घटनांबाबत शहर पोलिस ठाण्यात "अकस्मात मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे. 

तिसऱ्या घटनेत तालुक्‍यातील हिवरगाव पठारच्या शेंडगेवाडी येथील रमेश नामदेव काळे (वय 26) याने कर्जुले पठारच्या डोंगरावर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात "अकस्मात मृत्यू'ची नोंद झाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT