Tight fight between Rohit Pawar and Ram Shinde at Kharda 
अहिल्यानगर

खर्डा येथे रोहित पवार-राम शिंदे गटात टाईट फाईट

वसंत सानप

जामखेड : जामखेड तालुक्यात ऐकोन पन्नास ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत असून सर्वात लक्षवेधी खर्डा ग्रामपंचायतीची निवडणूक ठरते आहे. येथे आमदार रोहित पवार यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह कोलेकर यांच्या नेतृत्वाखालील ''महागटबंधन'' विरुद्ध माजी मंत्री राम शिंदे यांचे समर्थक 'भाजप'' चे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये सरळ लढत होते आहे. दोघांनी जय्यत तयारी केली आहे. या निवडणूकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

खर्डा (ता.जामखेड) एकूण जागा 17 करिता होणारी ही निवडणूक चुरशीची ठरेल अशी स्थिती आहे. या निमित्ताने गोलेकर आणि सुरवसे या दोन्ही युवक नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खर्डा जिल्हा परिषद गटात खर्डा ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. ज्याच्या हाती येथील सत्तेची सूत्रे त्याच पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असे समीकरण दहा वर्षांपासून पहायला मिळाले आहे.

या वेळी सत्तेसाठी दोन्ही बाजूने शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मागील पाच वर्षे येथील ग्रामपंचायतीच्या सत्तेची सूत्रे एकहाती  'भाजप' कडे राहिली. यावेळी भाजपला सत्तेपासून  रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी स्थानिक  कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन "महागठबंधन" तयार केले आहे.

आमदार रोहित पवारांच्या विचाराला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे . तर  'भाजप' चे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी पुन्हा सत्तेची सूत्रे कायम आपल्याच हाती रहावेत याकरिता  माजी मंत्री राम शिंदे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना  निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

एकूण  17 जागांसाठी होत असलेली ही निवडणूक चांगलीच रंगणार, असे चित्र आहे. खर्डागावातून अकरा सदस्य तर दरडवाडी, पांढरेवाडी, गितेवाडी, नागोबाचीवाडी, मुंगेवाडी या सहा वाड्यातून सहा सदस्य मिळून सतरा सदस्य संख्या असलेली ही   ग्रामपंचायतीत निवडून दिले जातात. मात्र, या सहा वाड्या ज्यांच्या बाजूने 'कौल' देतात त्यांनाच सत्तेची सूत्रे सहजासहजी मिळतात. असाच आजवरचा राजकीय इतिहास राहिलेला आहे. यावेळी नेमका कोणच्या बाजूने या वाड्यांचा कौल जातो, त्यावरच सत्तेची सूत्रे ठरतील हे मात्र निश्चित!
 
जामखेड तालुक्यात 58 ग्रामपंचायती असून यापैकी 49 ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे. याकरिता उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे .सरपंच पदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निघणार असल्याने गावोगाव पॅनलचा खर्च करणार्यांनी निवडणुकीतून काढता पाय घेल्याने तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत उत्साहाचे वातावरण नाही. मात्र, काही ठिकाणी बिनविरोध निवडणूकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तर काही ठिकाणी कसेबसे समोरासमोर पॅनल तयार करण्याची तयारी सुरू आहे, असे चित्र तालुक्यातीत पहायला मिळते आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT