Time to eat on the street despite the money 
अहिल्यानगर

पैसा देऊनही बंदमुळे खावे लागते रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा


श्रीरामपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरात लॉकडाउन लागू झाला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.

शहरातील नाश्‍ता सेंटर, चहासह विविध ठिकाणचे हॉटेल्स बंद झाले आहेत. लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर आता नियम आणि अटी घालून हॉटेलमधील पार्सल सेवा सुरू झाली. ग्राहक हॉटेलमधून साहित्याचे पार्सल घेत आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे हॉटेलात बसून नाश्‍ता करण्यास परवानगी नसल्याने ग्राहकांना हॉटेलमधून पदार्थ घेत रस्त्यावर उभे राहून ते खाण्याची वेळ आली आहे. 

लॉकडाउन शिथिलतेनंतर हॉटेलमधून पार्सल सेवा द्यावी, तसेच घरपोच सेवेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कोरोनाच्या धास्तीने खाद्यप्रेमींनी बाहेरच्या खाण्यावर आवर घातला आहे. येथील काही हॉटेलमधून खुल्या प्रमाणात वडापाव, समोसा, दाबेली, कांदाभजी, कचोरी, पोहे, इडली-सांबर, पाणीपुरी असे पदार्थ विकले जातात. यात प्रामुख्याने वडापावचा समावेश आहे.

श्रीरामपुरात ग्रामीण भागातून अनेक नागरिक रोज येथे खरेदीसाठी येत असल्याने मोठी गर्दी होते. काम आटोपल्यानंतर अनेक जण वडा, पोहे, शाबुदाना खिचडी, भेळीच्या ठेल्यावर जाऊन नाश्‍ता करत होते. परंतु कोरोनाच्या धास्तीने नाश्‍त्याचा आस्वाद घेणे अवघड झाले आहे. 

नाश्‍त्यासाठी हॉटेलात बसून खाण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेलमालक पदार्थ हातात देतात. नाईलाजाने रस्त्यावर उभे राहून ग्राहकांना नाश्‍ता करावा लागतो. काहींना रस्त्यावर खाण्याची लाज वाटते. ते चारचाकी वाहनात बसून पदार्थ खातात. 

ग्रामीण भागातील महिला विविध कामानिमित्त शहरात येतात. भूक लागल्यावर कोणत्याही हॉटेलमध्ये बसून नाश्‍ता करता येत नसल्याने त्यांना उपाशापोटी घरी परतावे लागते. जेथे बसण्यासाठी चांगली व्यवस्था आहे, तेथे सोशल डिस्टन्सिंग, नियम आणि अटींचे पालन करून ग्राहकांना हॉटेलात बसून नाश्‍ता करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT