To pay 2 months salary arrears of contract employees of Srigonde Municipal Council hunger strike abandoned after promise ahmednagar esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : श्रीगोंदे नगरपरिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 2 महिन्यांचे थकीत पगार देणार; आश्वासनानंतर सोडले उपोषण

श्रीगोंदे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारापैकी दोन महिन्यांचे पगार आठवडाभरात देण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार कंपनीने दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : श्रीगोंदे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारापैकी दोन महिन्यांचे पगार आठवडाभरात देण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार कंपनीने दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

रत्नप्रभा फॅसिलिटी या ठेकेदार कंपनीला शासनाचा निधी न मिळाल्याने मागील तीन महिन्यांपासून येथील नगरपरिषदेतील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. पगार तत्काळ देण्यात यावेत, तसेच अन्य काही मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

याबाबत काँग्रेसचे घनश्याम शेलार, भाजपचे विक्रमसिंह पाचपुते व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांशी व संबंधित ठेकेदार कंपनीशी चर्चा केली. त्यानंतर ठेकेदार कंपनीने आठवडाभरात दोन महिन्यांचे पगार देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी बाळासाहेब शेलार, संदीप नागवडे, बापू गोरे, अशोक खेंडके, राजेंद्र उकांडे, रमेश लाढाणे, सुनील वाळके, संग्राम घोडके, धनराज कोथंबिरे, अंबादास औटी, संजय खेतमाळीस, नंदकुमार ससाणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT