Toll collection is going on as usual at Parner as no order has been received from the toll plaza drivers 
अहिल्यानगर

Fastag Update : नुसता गोंधळ! फास्टॅगची अमंलबजावणी सुरु पण टोल नाका चालकांना आदेशच नाही

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : नगर-पुणे महामार्गावर सुपे नजीक म्हसणे फाटा येथे असलेल्या टोलनाक्यावर फास्टॅग गेली दोन महिन्यांपासून सुरू असल्याने या टोल नाक्यावरील टोल वसुली नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. मंगळवारपासून ज्या वाहनांना फास्टॅग नाही त्या वाहन धारकांकडून दुप्पट टोल वसूल करावा, असा सोशल मिडीयावर तसेच वृत्त पत्रातूनही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र संबंधित टोल नाके चालकांना तशा प्रकरचा कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने नेहमी प्रमाणेच टोलवसुली मंगळवारी सुरू होती.

तालुक्यात सुपे व टाकळी ढोकेश्वर येथे दोन टोलनाके आहेत. दोनही टोल नाके राज्यमहामार्गावर आहेत. मंगळवारपासून ज्या वाहनधारकांनी फास्ट टॅग केलेले नाही त्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करावा, अशी माहिती सोशल मिडीया तसेच वृत्तपत्रातील बातम्यामधून जनतेपर्यंत गेल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात तसा कोणताही आदेश सरकारी पातळीवर किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित टोल नाक्यांना मिळालेला नाही. तर ज्या वाहनधारकांनी फास्टॅग काढलेले नाही, त्यांच्याकडून दुप्पट टोल घ्यावा, असा नियम फक्त राष्ट्रीय माहामार्गासाठी आहे. असेही टोलनाक्यावरील काही अधिका-यांनी सांगितले. मात्र या बाबत कोणाकडेच खात्रीशीर माहिती मिळाली नाही. कारण तसा कोणताही सरकारी आदेश अद्याप तरी टोलनाक्यावर प्राप्त झालेला नाही. तसेच आम्ही आमच्या आठही मार्गावर वाहन धारकांसाठी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

    
टोल नाक्यांना फास्टॅगच्या नवीन नियमाचा कोणताही सरकारी आदेश नसल्याने मंगळवारी नेहमीप्रमाणे टोलवसुली सुरू होती. टोल नाक्यावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच गेली दोन महिन्यांपासून टोल नाक्यावर फास्टॅग सुविधा असल्याने नगर-पुणे महामागार्वरील म्हसणे फाटा टोलवर कोणतीही अडचण आली नाही. 

आमच्यापर्यंत कोणताही फास्टॅग बाबतचा आदेश प्राप्त झाला नाही. आम्ही आमच्या टोलनाक्यावर फास्टॅगची सुविधा केली आहे. त्यामुळे आज आमच्याकडे कोणताही गोंधळ झाला नाही. आम्ही कोणाकडूनही दुप्पट टोल वसूल केला नाही, कारण तसा सरकारी आदेश आम्हाला मिळालेला नाही, तसा आदेश आल्यावर कार्यवाही करावी लागेल.
-लक्ष्मण पालवे, टोल व्यवस्थापक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT