भाजीपाला कवडीमोल भावाने 
अहिल्यानगर

Tomato News : टोमॅटो कवडीमोल; उत्पादक अडचणीत

Chinmay Jagtap

Tomato News : दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी भाव मिळत होता, मात्र आता अवघा तीन ते चार रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या माहुली येथील शैलेश गाडेकर यांनी टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने जुलै महिन्यात जवळपास एक एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर लागवड केली होती. पाणीटंचाई असतानादेखील त्यांनी पिकाची चांगली काळजी घेतली. टोमॅटो तोडणी सुरू होऊन दहा ते बारा दिवस झाले, मात्र आता याच सोन्यासारख्या टोमॅटोला अवघा तीन ते चार रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे गाडेकर यांनी डोक्यालाच हात लावला आहे. झालेला खर्चही वसूल होतो की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन महिन्यांपूर्वी याच टोमॅटोला उच्चांकी भाव मिळत होता म्हणून हे पीक घेतले, पण भाव कोसळल्याने पिकावर झालेला खर्च अंगलट येणार असल्याची व्यथा या तरुण शेतकऱ्याने मांडली आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू आहे.

अशा कठीण स्थितीतही पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी आदी गावांमधील शेतकऱ्यांनी खासगी टँकरद्वारे विकतचे पाणी आणून टोमॅटोचे फड जगवले आहेत. पण भाव घसल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

दुष्काळसदृश स्थिती आहे तरीही चांगलाभाव मिळे म्हणून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र, आज प्रतिकिलोस तीन ते चार रुपये भाव मिळत आहे. यामुळे टोमॅटो पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नाही.

- शैलेश गाडेकर, टोमॅटो उत्पादक, माहुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT