Tomorrow's agitation in Parner to support the farmers' agitation 
अहिल्यानगर

भूमिपूत्र शेतकरी संघटना झाली आक्रमक, उद्या करणार चक्का जाम

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात संयुक्त किसान एकता मोर्चाने पुकारलेल्या राष्ट्रव्यापी "चक्काजाम" आंदोलनाला  सक्रीय पाठिंबा दिला आहे. पारनेर तालुक्यातील शेतकरी संघटना ता.०६ रोजी टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन करणार आहे.

या बाबत तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली.

वाडेकर म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकारने जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले नवीन तीन काळे कायदे ताबडतोब रद्द करावेत. या मागणीसाठी गेल्या 70 दिवसांपासून संपूर्ण देशातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करीत आहेत. मात्र, असंवेदनशील सरकारवर अद्याप कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही.

याउलट सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा व बळाचा गैरवापर करून शेतकऱ्यांवर दडपशाही व अत्याचार करीत आहेत. या विरोधात आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहे.

निवेदनावर बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर, राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश देशमुख, संतोष कोरडे, सीताराम देठे, सुभाष गायकवाड, संतोष खाडे, रवींद्र साळवे यासंह अन्य शेतकरी संघटनांच्या सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT