rashin narashin nagarar 
अहिल्यानगर

राशीनच्या जगदंबा देवीचे मंदिर उघडणार का?

दत्ता उकिरडे

राशीन (नगर) : राज्याचे आराध्य दैवत असलेल्या राशीनच्या जगदंबा (यमाई) देवीचा नवरात्रोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेले जगदंबा देवीचे मंदिर उघडणार का, प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे राशीनकरांसह राज्यातील भाविकांचे लक्ष लागले आहे. 

घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत राशीनच्या जगदंबा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाचे विविध प्रेक्षणीय कार्यक्रम असतात. या काळात राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे दररोज हजेरी लावतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. बंद असलेले मंदिर नवरात्रोत्सवकाळात उघडले जाईल का याबाबत पुजारी, ग्रामस्थ, विश्‍वस्त आणि भाविकांमध्ये साशंकता आहे. जिल्हाधिकारी या तीर्थक्षेत्रांबाबत काय निर्णय देतात यावरच येथील यंदाच्या नवरात्रोत्सवाचे स्वरूप अवलंबून राहणार आहे.
 
राशीनच्या नवरात्रोत्सवाबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, याविषयी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे. राशीनचे मंदिर उघडले तर येथे गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला मोठया उपाययोजना कराव्या लागतील. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविकांचे लोंढे, आराध्यांचे जथ्थे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य राखीव दलाची अथवा धडक कृती दलाची सशस्त्र तुकडी तैनात करावीच लागेल. तसेच नित्याचे पारंपारिक पूजेचे आणि धूप आरतीच्या कार्यक्रमासाठीही खास नियोजन करावे लागेल. मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी सोशल माध्यमे, केबल आणि पडद्यावर प्रक्षेपण करून भाविकांना देवी दर्शन उपलब्ध करून द्यावे लागेल.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, मंदिरे उघडण्याबाबत अद्याप शासनाचे कोणतेही निर्देश आलेले नाहीत, तसे आदेश प्राप्त होताच तात्काळ मंदिरे उघडण्याची कारवाई करू. 

जगदंबा देवी पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख म्हणाले, नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यासोबत विश्‍वस्त मंडळाची लवकरच बैठक होईल. तिथे जो निर्णय होईल त्याप्रमाणे यात्रोत्सव साजरा केला जाईल. 

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT