Transfers of staff in the Municipal Town Planning Department 
अहिल्यानगर

महापालिकेच्या नगररचनात झाली फेररचना, तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

नगर : अहमदनगर महापालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुमारे दहा महिन्यांपूर्वी केलेल्या बदल्यांसंदर्भात मोठा वाद झाला होता. बदल्या झालेले काही कर्मचारी पुन्हा नगर रचना विभागात येण्यासाठी प्रयत्नरत होते. अखेर आज महापालिकेच्या नगररचना विभागातील तीन जणांच्या बदल्या करून इतर विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील तीन जणांना नगररचना विभागात स्थान देण्यात आले.

सुमारे दहा महिन्यांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी नगर रचना विभागातील कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या होत्या. या बदल्यांनंतर बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा नगररचना विभागात नियुक्ती मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले होते.

महापालिकेतील उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी आज आज सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात नगररचना विभागातील कर्मचारी इतर विभागात पाठवण्यात आले. तीन कर्मचाऱ्यांना नगररचना विभागात घेण्यात आले आहे. 

नगररचना विभागातील राजाराम मोरे यांची प्रसिद्धी विभागात नितीन गोरे यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात तर कृष्णा साळवे यांची प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सतीश दारकुंडे जितेंद्र सासवडकर व संजय चव्हाण यांची नगर रचना विभागात बदली करण्यात आली. नगर रचना विभागातून बदली झालेले तीनही कर्मचारी नगर रचना विभागात बदली होण्यापूर्वी याच विभागात त्याच पदावर कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT