file photo 
अहिल्यानगर

एसटी सुटली सुसाट

दिवसभरात ८५ हजार प्रवाशांची वाहतूक : रोजचे सुमारे ५५ लाखांचे उत्पन्न

दौलत झावरे

अहमदनगर - कोरोना महामारीनंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळाचे चाक रुतलेले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने एसटीचे चाक वेगाने फिरू लागले आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या जिल्ह्यात ४९५ बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. रोज ८५ हजार प्रवाशांच्या माध्यमातून सुमारे ५५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

‘बहुजन हिताय बहुजन सुखाय'' या ब्रीद वाक्यानुसार एसटीचा कारभार सुरू आहे. कोरोना माहामारीच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे एसटीचे मोठे नुकसान झाले. या काळातही परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी नेऊन सोडण्याचे काम एसटीने केलेले आहे. तसेच मुंबईतील नागरिकांनाही एसटीने कोरोना काळात सुविधा पुरविलेली आहे. त्यानंतर एसटीची सेवा पूर्ववत होत असताना कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले. संपाच्या काळात खासगी प्रवासी वाहतूक जोमाने सुरू झाली. त्याचा परिणाम संप मिटल्यानंतर एसटी प्रशासनाला सहन करावा लागला.

आता एसटीची परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. मागील वर्षी एसटीच्या ३३४ बस सुरू होत्या. मात्र यंदा ४९५ बस सध्या जिल्ह्यासह राज्यभरात धावत असून, प्रवाशांना सुविधा देत आहे. जिल्ह्यात एकूण ५७५ बस असून, त्यातील ४९५ रोज धावत आहेत. या बसच्या माध्यमातून दिवसभरात एक हजारच्या वर दैनंदिन फेऱ्या होत आहे. एसटीतून दररोज ५० ते ६० हजार प्रवासी रोज प्रवास करीत आहेत. कोरोनानंतर विस्कळित झालेली एसटीची सेवा पूर्ववत चांगली सुरळीत झालेली आहे. आता पूर्वीप्रमाणेच सर्व ग्रामीण भागात सुरु होत्या. त्या फेऱ्याही पुन्हा सुरु झालेल्या आहेत.

पांडुरंग अहमदनगर विभागाला पावले

आषाढी एकादशीनिमित्त अहमदनगर विभागाने एकूण २०० बसचे नियोजन केले होते. इतर जिल्ह्यांतून आलेल्याही बस पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात आल्या होत्या. मात्र, अहमदनगर विभागाच्या २०० बसच्या माध्यमातून १०७८ बसच्या फेऱ्या झालेल्या आहेत. या सर्व बसने दोन लाख ४९ किलोमीटर करून ८१ लाख ९८ हजाराचे उत्पन्न मिळविलेले आहे. ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतींसह अहमदनगर विभागाला सुमारे एक कोटी तीन लाख ८३ हजाराचे उत्पन्न मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तालुकानिहाय सुरू बस

तारकपूर ६२, शेवगाव ४६, जामखेड ४२, श्रीरामपूर ४५, कोपरगाव ५७, पारनेर ३३, संगमनेर ४९, श्रीगोंदे ५०, नेवासे ३६, पाथर्डी ३७, अकोले ३८.

आकडे बोलतात

  • जिल्ह्यात एकूण बस ः ५७५

  • रोज धावतात बस ः ४९५

  • रोजचे किलोमीटर ः १८३०००

  • रोजचे प्रवासी ः ६००००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT