Tribal conversion was to take place at Christmas 
अहिल्यानगर

ख्रिसमसला होणार होतं आदिवासीचं धर्मांतर, गावकऱ्यांनी उधळला कार्यक्रम

शांताराम काळे

अकोले : तालुक्यात नाशिकच्या हद्दीलगत आदिवासी बहुल गावं आहेत. तेथील आदिवासींना आमिषे दाखवून धर्मांतर घडवून आणले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील काही धर्मगुरू येथे येत आहेत, असा आदिवासी विकास परिषदेचा आरोप आहे. तेथे चर्च उभारण्यासाठी आदिवासींची जमीन बक्षीसपत्र करून घेतली होती. वास्तविक तसे करता येत नाही.

तिरढे (ता. अकोले) येथील कचरू सखाराम सारुकते यांच्या जमिनीवर चर्चचे भूमिपूजन फादर व त्यांच्या अनुयायांनी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिवासींच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. परंतु, आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तो उधळून लावला.

त्यानंतर ग्रामसभा घेऊन धर्मांतर किंवा अंधःश्रध्दा गावात होऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत अकोले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. 

नाताळनिमित्त तिरढे येथे संबंधित फादर व इतर लोक आले होते. त्यांनी तेथे चर्चच्या भूमिपूजनाचा प्रयत्न केला. या वेळी तिरढे, पाडोशी, एकदरे, देवगाव, भंडारदरा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. धर्मांतर होणार असल्याचे कळताच आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेऊन हा प्रकार हाणून पाडला.

सरपंच संगीता गोडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी हा धर्मांतराचा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असून, सरकारी कर्मचारी यात सहभागी आहेत, असा आरोप केला. 

यावेळी आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव, आदिवासी सेलचे अध्यक्ष सुरेश भांगरे, सरपंच परिषदेचे राज्य सचिव पांडुरंग खाडे, बाळू भांगरे, काळू भांगरे, चित्रा जाधव, दिनेश शहा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT