Chopdar Ramesh Kaitake and Babasaheb Kaitake sakal
अहिल्यानगर

Sonai News : सख्खे भाऊ रुबाबदार चोपदार! २० वर्षांपासून सेवा; आतापर्यंत सातशे पारायण सप्ताहात लावली हजेरी

दिसायला डबलरोल असलेल्या चोपदार जोडीला येत आहे राज्यातून मागणी.

विनायक दरंदले

सोनई - दोन सख्ख्या बंधुंनी मनात कुठलाही संकोच न आणता अंगात भरजरी लाल कपडे, डोक्यात पगडी आणि हातात दंडक घेऊन जिल्ह्यात व जिल्ह्याच्या बाहेर होत असलेल्या पारायण सप्ताहात ‘भालदार - चोपदार’ पणाची भूमिका अतिशय आनंदाने करीत आहेत. रमेश तबाजी कैतके व बाबासाहेब तबाजी कैतके या दोन सख्ख्या भावांच्या आध्यात्मिक कार्याने कुटुंबातील इतर सदस्यात संस्काराचे बीज पेरले गेले आहे. दिसायला डबलरोल असलेल्या या चोपदार जोडीला आता राज्यातून मागणी येऊ लागली आहे.

मागील आठवड्यात मोरया चिंचोरे (ता.नेवासे) येथील भागवत कथा सोहळ्यातील काल्याच्या कीर्तनात कैतके बंधू व्यासपीठावर भालदार, चोपदार म्हणून उभे होते. कीर्तन झाल्यानंतर या जोडीबरोबर छायाचित्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मोठे बंधू रमेश कैतके यांनी सन २००४ साली चोपदार म्हणून कीर्तनात उभे राहिले होते. सन २०१४ साली त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर लहान भाऊ बाबासाहेब कैतके यांनी अंगात चोपदाराचे वस्र घालून सेवा बंद पडू दिली नाही. काही महिन्यांनंतर आजार बरा झाल्याने दोघेही सेवाकार्य करू लागले.

वडील तबाजी कैतके पंढरपूरची वारी करीत असल्याने दोन्ही मुलांना आध्यात्मिक कार्याची आवड लागली. कीर्तन, प्रवचन व कथा सोहळ्यात चोपदार म्हणून काम करताना रामकृष्ण हरीचा नामजप होत असल्याने समाधान असल्याचे बाबासाहेब कैतके यांनी सांगितले. वीस वर्षांत सातशेहून अधिक सप्त्याला हजेरी लावली.

त्रिंबकेश्वर, वैजापूर, वडगाव, श्रीरामपूर, अहमदनगर आदी मोठ्या गावांसह या जोडगोळीने छाप उमटवली आहे. कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत संसाराला चांगला आकार दिला आहे.

अलीकडच्या काळात कीर्तनात भालदार, चोपदार होण्यास कोणी धजावत नाही. आम्ही दोघे भाऊ चोपदार म्हणून कार्य करताना धर्ममंडपात सेवाकार्य करीत आहे. कदम माउली (छोटे) यांच्या २४ जून रोजी सासवड येथील सप्ताहास उपस्थित राहणार आहे.

- रमेश कैतके, चोपदार, केंदळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; धरणात 92.70 टीएमसी पाणीसाठा : पावसाचा जोर ओसरला

Gold Price Forecast : अमेरिका-इराण संघर्षाचा सोन्या-चांदीवर परिणाम; सोन्याच्या दरावर दबाव कायम, भाव आणखी वाढणार?

Amit Shah NUC FDC: राज्यात नागरी सहकारी वित्त महामंडळ, अमित शहा यांची घोषणा, शहरी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

PMC Tree Cutting Issue : बांधकामासाठी ५०० झाडं तोडली, पण ३५०० कुठे लावली? नियमबाह्य वृक्षतोडीवरून पुणे महापालिकेची कोंडी

SCROLL FOR NEXT