Two brothers and mother and a child drowned in Akola on the same day
Two brothers and mother and a child drowned in Akola on the same day Sakal
अहमदनगर

अकोल्यात चौघांचा बुडून मृत्यू; सख्खे भाऊ, माय-लेकरावर काळाचा घाला

शांताराम काळे


अकोले (जि. अहमदनगर) :
अकोले तालुक्यातील दोन सख्खे भाऊ आणि माय-लेकराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच दिवशी चौघांचा मृत्यू झाल्याने दुःखाचे वातावरण आहे. एक घटना निळवंडे धरणात घडली, तर दुसरी घटना आदिवासी पट्ट्यात मान्हेरे येथील एका विहिरीत घडली.

निळवंडे जलाशयात अंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. राजूर येथील समीर शांताराम पवार (वय १४) व सोहम शांताराम पवार (वय ११) या दोन सख्ख्या भावंडांवर काळाने घाला घातला. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.

राजूर येथील ही भावंडे आपल्या मुंबई येथील नातेवाइकांसोबत फिरण्यासाठी निळवंडे जलाशयावर गेली होती. तेथे पाणी पाहून त्यांना अंघोळीचा मोह आवरला नाही. समीर व सोहम धरणाजवळील पुलाच्या खाली अंघोळीसाठी पाण्यात उतरले. लाटेमुळे आत खेचले गेले. भोवरा तयार झाल्याने ते बुडाले. त्यांचे नातेवाईक आकाश जाधव व अर्जुन गायकवाड यांनी ही माहिती मुलांच्या वडिलांना कळविली. त्यानंतर नातेवाईक जमा झाले.

स्थानिक मच्छीमार सोमनाथ मेंगाळ यांनी सायंकाळी नदीपात्रात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा त्यांना समीरचा मृतदेह सापडला. तर आज (सोमवारी) सकाळी सोहमचा मृतदेह आढळून आला. अकोले पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात समीर हा नववीत व सोहम सहावीत शिकत होता. घटनेची माहिती समजताच शिक्षक व विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली.

माय-लेकराला जलसमाधी

तालुक्यातील आदिवासी भागातील मान्हेरे येथील एका शेतातील विहिरीत बुडून माय-लेकराचा मृत्यू झाला. गंगूबाई यशवंत गभाले (वय ३१) व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर (वय ५) अशी या माय-लेकरांची नावे आहेत. अकोले तालुक्यातील मान्हेरे गावाच्या शिवारात पांडू शंकर गभाले यांच्या शेतातील विहिरीत ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती राजूर येथील देशमुखवाडीचे मारुती गोगा देशमुख यांनी राजूर पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी हजर झाले, पण विहिरीत खूप पाणी असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले. दोन विद्युतपंपांच्या साहाय्याने पाणी उपसल्यावर, दुपारनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.

राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून प्रवरानगर रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. ही आत्महत्या आहे की घातपात, हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर समजणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT