Well esakal
अहिल्यानगर

Crime News : आईसह दोन लहान मुलांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आल्याने परिसरात उडाली खळबळ

पळशी (ता. पारनेर) येथील नागापूरवाडीमध्ये आईसह दोन लहान मुलांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर - पळशी (ता. पारनेर) येथील नागापूरवाडीमध्ये आईसह दोन लहान मुलांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बायडाबाई सोमा बिचकुले (वय २६), कांचन सोमा बिचकुले (वय ५), समाधान सोमा बिचकुले (वय २) असे मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

शनिवारी (ता.५ ) दुपारी पावणे तीनच्या सुमारास माका नामदेव बिचकुले यांच्या विहिरीमध्ये लहान मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना लालू कोळेकर (रा. पळशी) यांना दिसला. या घटनेची माहिती कोळेकर यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र जावळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रीतम मोढवे, रवींद्र साठे, विवेक दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंच प्रकाश राठोड यांनी ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने महिलेसह दोन मुलीचा मृतदेह बाहेर काढला.

मात्र लहान मुलाचा मृतदेह आज (ता. ६) मिळून आला. आईने आपल्या मुलांसह आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. दरम्यान, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT