Two crimes of "atrocity" in Karjat taluka 
अहिल्यानगर

कर्जत तालुक्‍यात "ऍट्रॉसिटी'चे दोन गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : तालुक्‍यातील कोरेगाव व शिंदे येथे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ऍट्रॉसिटी) दोन गुन्हे दाखल झाले. यातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

तालुक्‍यातील कोरेगाव येथे रस्त्याने जाताना वाहनाला साइड मागितल्याच्या कारणावरून एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगावजवळील मुरकुटवाडी येथील रहिवासी राहुल आजीनाथ सूळ यांनी दिलेल्या फिर्यादीचा आशय असा ः राहुल सूळ व त्यांची पत्नी गलांडवाडी फाटा येथून घरी जात असताना रस्त्यावर दादा नवनाथ मुरकुटे एका ट्रॅक्‍टरचालकासोबत रस्त्यावर गाडी उभी करून गप्पा मारत होते.

सूळ यांनी मुरकुटे यांना गाडी बाजूला घेऊन रस्त्यावरून जाण्यासाठी जागा देण्यास सांगितले; परंतु त्यांनी जागा दिली नाही. काही वेळाने आरोपी मुरकुटे फिर्यादी सूळ यांच्या घरी गेले आणि जातिवाचक शिवीगाळ केली. लाकडाने फिर्यादीला मारहाण केली व त्याच्या पत्नीला लाथ मारून ढकलून दिले, जिवे मारण्याची धमकी दिली.

मुरकुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्‍यातील शिंदे येथे शाळेतील मुलीला त्रास देण्याच्या कारणावरून वाद झाला. फिर्यादी रामदास मुकिंदा भवाळ यांनी दिलेल्या फिर्यादीचा आशय असा ः माझी नात शिंदे येथे एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. तिला राहुल दत्तात्रय घालमे त्रास देत असे.

या बाबत समजावून सांगितले. मात्र, नंतर भवाळ शिंदे गावातील विठ्ठल मंदिराच्या कट्ट्यावर बसले असताना आरोपी राहुल घालमे व किरण घालमे तेथे गेले. "तू इथं का बसलास? तुझी किती पोरं आहेत, ती घेऊन ये, बघतोच,' असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच पत्नीला शिवीगाळ केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

SCROLL FOR NEXT