Two criminals have been arrested in Shrirampur 
अहिल्यानगर

श्रीरामपूर - दोन गुन्हेगार जेरबंद; अंधाराचा फायदा घेऊन चौघे फरार

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्यांतील चौघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपींकडून 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (ता. 18) पहाटे दोनच्या सुमारास वाकडी (ता. राहाता) शिवारात करण्यात आली.
 
वाकडी शिवारातील गोटेवाडी कालव्याजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत काही व्यक्ती दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन टपरीला घेराव घातला. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी वाहने सोडून पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून शुभम अनिल काळे, भरत ऊर्फ भऱ्या तात्याजी काळे (दोघेही रा. गणेशनगर, ता. राहाता) यांना ताब्यात घेतले, तर चार जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
 
ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडे चौकशी केली असता, आनंद अनिल काळे, अक्षय यशवंत आव्हाड, गणेश भिकाजी तेलोरे (तिघेही रा. गणेशनगर, ता. राहाता) व राहुल वाघमारे (रा. रांजणगाव, ता. राहाता), अशी पळून गेलेल्यांची नावे त्यांनी सांगितली. पोलिसांनी दोन दुचाकी, तलवार, गलोल, मोबाईल व मिरचीपूड, असा एकूण 71 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. पोलिस नाईक संतोष लोढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

दुचाकीही चोरीच्या 

अटक केलेल्या आरोपींवर औरंगाबाद, नेवासे, वाळुंज, पाथर्डी पोलिस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या दोन्ही दुचाकी नगर येथून चोरी केलेल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT