Two different corono reports of the patient from Pune & Dhule Laboratory 
अहिल्यानगर

कोणाचं खरं मानायचं.. पुण्याच्या प्रयोगशाळेत "निगेटिव्ह', तर धुळ्यातून अहवाल "पॉझिटिव्ह' 

आनंद गायकवाड

संगमनेर : पुण्याच्या प्रयोगशाळेच्या निगेटिव्ह अहवालाचा दाखला देत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने निंबाळे येथील रुग्णास डिस्चार्ज दिला. मात्र, धुळ्याच्या प्रयोगशाळेतील त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभाराबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

निंबाळे येथील 30 वर्षीय युवकाला मेंदूतील रक्तस्रावामुळे 19 मे रोजी त्याची सासुरवाडी असलेल्या जांबूत येथून संगमनेरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. येथून त्याला नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविले. तेथूनच त्याची रवानगी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 20 मे रोजी झाली.

नाशिकच्या रुग्णालयातुन डिस्चार्ज

कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने 21 मे रोजी त्याच्या घशातील स्रावाचे नमुने नाशिकची प्रयोगशाळा बंद असल्याने धुळ्याच्या प्रयोगशाळेत पाठविले. मात्र, तेथून वेळेवर अहवाल आला नाही. त्यामुळे या रुग्णाचे 24 मे रोजी पुन्हा स्राव घेऊन तो पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविला. त्याचा अहवाल 25 मे रोजी निगेटिव्ह आला. त्यामुळे नाशिकच्या रुग्णालयाने त्याला डिस्चार्ज दिला. मात्र, त्याच्यावर नाशिक येथेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

तिसऱ्यांदा घेतला स्राव नमुना

दरम्यान, धुळ्याच्या प्रयोगशाळेतील प्रलंबित अहवाल नाशिकच्या आरोग्य विभागाला आज मिळाला. त्यात संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. याबाबत तातडीने संगमनेरच्या प्रशासकिय यंत्रणेला माहिती देण्यात आली. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला पुन्हा एकदा नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पुन्हा त्याच्या घशातील स्राव घेण्यात आला. आता तो तपासणीसाठी पाठविला असून, त्याच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. तोपर्यंत हा रुग्ण पॉझिटीव्ह की निगेटिव्ह, याबाबत प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे. 

रुग्णाचे कुटुंबीय "होम क्वारंटाईन' 

या घटनेमुळे आरोग्य विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला. दरम्यान, संगमनेरच्या महसूल व आरोग्य प्रशासनाने संबधित रुग्णाच्या कुटुंबीयांना "होम क्वारंटाईन' केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT