अहिल्यानगर

शिर्डीत पावणेदोनशे कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः नगरपंचायतीला शहर स्वच्छतेचे प्रत्येकी 15 कोटींचे बक्षीस दोन वेळा मिळाले. या कामगिरीत सिंहाचा वाटा असणाऱ्या सुमारे 175 कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने पगार दिलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद करीत ठिय्या आंदोलन सुरू केले.

शहरात कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या घंटागाड्यांचा आवाज आजपासून बंद झाला. नगरपंचायत कार्यालय परिसर ठिय्या देणाऱ्या कामगारांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. 

रोज 50 हजार भाविक शिर्डीत येतील, असे गृहीत धरून साईसंस्थान नगरपंचायतीला शहर स्वच्छतेसाठी दरमहा 42 लाख रुपये देते. साईमंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीत येत नाहीत. त्यामुळे साईसंस्थानने ही रक्कम देणे थांबविले. या अडचणीच्या काळात ठेकेदार कंपनीने हात वर गेले.

कोविड महामारीत स्वच्छतेचे काम करणारे हे योद्धे मात्र काम करूनही पगारापासून तब्बल तीन महिने वंचित आहेत. 
कामगार नेते जीवन सुराडे म्हणाले, ""नगरपंचायत फंडातून कामगारांचे वेतन अदा करावे. कामगारांनी चांगले काम केल्याने नगरपंचायतीला दोन वेळा 15 कोटींची बक्षिसे मिळाली. त्यातून पगार करावेत.

तीन महिन्यांत कामगारांनी रोज काम केले; मग त्यांना ठेकेदाराने वेतन का दिले नाही? घरभाडे देता येत नसल्याने घरमालक कामगारांना घर सोडण्याचा तगादा लावतो. कामावर येण्यासाठी मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरायला पैसे नाहीत. उधारी थकल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आली. नाइलाजाने आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले.'' 

माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते म्हणाले, ""साईसंस्थानने उत्पन्न बंद झाले या कारणास्तव कंत्राटी कर्मचाऱ्यांची 40 टक्के वेतनवाढ मागे घेतली. मात्र, त्याचा फटका कोविडयोद्धे म्हणून काम करणाऱ्या 173 कर्मचाऱ्यांनाही बसला. खरे तर त्यांना या निर्णयातून वगळायला हवे होते.

रोज 50 हजार भाविक येण्याचे बंद झाले, या कारणास्तव साईसंस्थानने नगरपंचायतीला दरमहा 42 लाख रुपये देणे बंद केले. त्यावेळी सर्व संबंधितांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अडचण दूर करण्यास प्राधान्य द्यायला हवे होते. ठेकेदार कंपनीने आपली जबाबदारी झटकायला नको होती.'' 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT