Two hundred and fifty corona patients in two days in Parner 
अहिल्यानगर

पारनेरमध्ये दोन दिवसांत अडीचशे कोरोनाबाधित

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेर तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील दोन दिवसांत २४२ रुग्ण आढळले. रुग्णवाढीचा वेग असाच राहिला, तर तालुक्‍यात रुग्णांना बेड मिळणे कठीण होणार आहे. 

तालुक्‍यात पारनेर ग्रामीण रुग्णालयात कोरोना उपचार केंद्र आहे. पिंपळगाव रोठे येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच सुपे व कर्जलेहर्या येथे खसगी कोविड उपचार केंद्र आहेत.

सध्या तालुक्‍यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात अणखी कोरोना सेंटरची गरज भासणार आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात असलेल्या रुग्ण संख्येपेक्षा या वर्षी तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे. मृत्युदर देखील अधिक आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. 

तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाने 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वर्षभरात चार हजार रुग्ण आढळून आले आहेत. 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कन्टोन्मेंट झोन तयार करणे, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या टेस्ट करणे, यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 131 गावांत कोरोना ग्रामसमित्यांची स्थापना केली आहे. समितीवर गावातील संशयीतांचा शोध घेऊन त्यांच्या टेस्ट करूण घेण्याची जबाबदारी आहे. समितीत सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक व माध्यामिक शिक्षक, अंगणवाडी सेवकांचा समावेश आहे.

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT