Two leopards fight for power for two and a half hours 
अहिल्यानगर

सत्तेसाठी दोन बिबट्यांची थरारक झुंज! अडीच तासांनंतर एक गतप्राण

सतीश वैजापूरकर

राहाता ः तालुक्‍यातील एकरुखे येथील शेतकरी सुधाकर सातव यांच्या घरामागे काल (ता.24) अवघ्या अडीचशे फुटांवर दोन बिबटे एकमेकांना भिडले. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तब्बल अडीच तास झुंजले. अखेर रक्तबंबाळ झालेल्या एका बिबट्याने जमिनीवर लोळण घेत प्राण सोडला. त्यानंतर ही जिवघेणी झुंज थांबली. आपल्या घरामागे सुरू असलेला हा थरार म्हणजे रानडुकरांचा उच्छाद असावा, असे समजून सातव कुटुंबीय निवांत झोपले. मात्र काल सकाळी खरा प्रकार लक्षात येताच त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 

दोन बिबटे कधीही समोर येत नाही

वनरक्षक जी. बी. सुरासे सकाळी दहाच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन नर बिबटे कधीही एकमेकांच्या समोर येत नाहीत. मात्र वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकमेकांच्या समोर आले, तर त्यांच्यात हमखास झुंज होते. एकाच मृत्यू झाल्याशिवाय ती थांबत नाही. यापूर्वीही श्रीरामपूर तालुक्‍यात अशाच पद्धतीच्या दोन झुंजी झाल्या. काल रात्री झुंजलेले हे दोन्ही बिबटे चार वर्षे वयाचे होते. दोघेही तुल्यबळ असल्याने तब्बल अडीच तास झुंज चालली. 

मृत बिबट्याच्या पोटावर मोठी जखम झाली होती. जबडा व शरीरावर ठिकठिकाणी पंजाच्या वाराने खोल जखमा झाल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

वस्तीवरील कुत्री मक्‍याचे दिशेने पाहून भुंकत होती. प्राण्यांचे आवाज देखील येत होते. ते बिबटे असतील असे वाटले नाही. रानडुकरे मस्ती करीत असल्याचा समज झाला. त्यामुळे रात्री झोपी गेलो. सकाळी खरा प्रकार लक्षात आल्याने हादरून गेलो. 
- सुधाकर सातव, शेतकरी 

मृत्युमुखी झालेल्या बिबट्याने झुंजीपूर्वी तासभर आधी अविनाश गाढे यांच्या मालकीचा बोकड फस्त केला होता. आज मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत या बिबट्याच्या पोटात या बोकडाचे शीर सापडले. दुसऱ्या बिबट्यास पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला जाणार आहे. 
जी. बी. सुरासे, वनरक्षक, अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT