क्राईम न्यूज  फाईल
अहिल्यानगर

राशीनचे दोन गुंड पाच जिल्ह्यांतून तडीपार

दत्ता उकिरडे

राशीन : कर्जत तालुक्‍यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याचे प्रयत्न सध्या कर्जत पोलिसांकडून सुरू आहेत. कर्जतसह अन्य पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोन गुन्हेगारांना पाच जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.

राम जिजाबा साळवे (वय 26), सागर नवनाथ साळवे (वय 24, दोघेही रा. राशीन, ता. कर्जत) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जमाव जमवून मारामारी, दरोडा, गंभीर दुखापत, असे गुन्हे दाखल असल्याने व ते वारंवार काही ना काही गुन्हे करत असल्याने सामान्य नागरिकांच्या जीवितास भय निर्माण झाल्याने, त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव करून तो उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी अर्चना नष्टे यांनी मंजूर केला आहे. या दोघांनाही नगर, बीड, पुणे, सोलापूर, नाशिक, अशा पाच जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.

गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न!

तालुक्‍यातील गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी कर्जत पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही, कसल्याही प्रकारचे गुन्हे असले, तरी त्यींचा तपास लवकरात लवकर लावला जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर दहशत निर्माण होऊन गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होताना दिसते.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

JPSC-JSSC घोटाळ्याचा तपास वेगात; दिल्लीतून ISN संचालकाला अटक, ८०० OMR शीटची पडताळणी सुरू

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

SCROLL FOR NEXT