Two minor girls who went missing from Sonai were found in Bhagwangad area 
अहिल्यानगर

सोनईतून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुली भगवानगड परिसरात सापडल्या

सकाळ वृत्तसेवा

सोनई (अहमदनगर) : सोनई- शनिशिंगणापूर रस्त्यावरील मुळा गट परिसरातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलीस सोनई पोलिसांनी शनिवारी दुपारी भगवानगड परिसरातून ताब्यात घेतले आहे. 

ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या गट परिसरातून १६ व १७ वर्ष वय असलेल्या दोन अल्पवयीन मुली घरातून गेल्यानंतर त्या पुन्हा आल्याच नाही. काही तास वाट पाहिल्यानंतर नातेवाईकांनी सोनई पोलिस ठाण्यात हारवल्याची खबर दिली होती. मुळा कारखान्याचे सुरक्षाधिकारी प्रविण चौधरी व सुरक्षा विभागाने सर्वत्र शोध घेतला होता.

दोन दिवसापासून शोध सुरु असताना शनिवारी दुपारी सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रविण अव्हाड व अमोल जवरे यांनी एका मुलाच्या मोबाईल लोकेशनवरुन पानेवाडी (ता.पाथर्डी) हून भगवानगड रस्त्यावर पायी जाताना मुलीस ताब्यात घेतले. बरोबर असलेल्या एका नातेवाईकाने दोन्ही मुलीस ओळखले आहे. रात्री उशिरा जवाब व आवश्यक बाबी पूर्ण करुन मुली नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT