नगर अर्बन बॅंक sakal News
अहिल्यानगर

नगर अर्बन बॅंकेला कोण वाचविणार? निवडणुकीसाठी दोन पॅनल

मुरलीधर कराळे

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील व्यापार क्षेत्राला गती देणारी बॅंक म्हणून नावाजलेल्या नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅंकेच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. आर्थिक गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेली ही बॅंक बंद करण्याचा इशारा रिझर्व्ह बॅंकेने दिला होता तथापि, प्रशासक नियुक्त करून बॅंक आतापर्यंत वाचली. आता तिला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व वाचविण्यासाठी दोन पॅनल रिंगणात उतरत आहेत.

नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या आर्थिक घटकांपैकी जिल्ह्यातील सहकारी बॅंकांचा मोठा वाटा आहे. त्यात नगर अर्बन बॅंकेचा वाटा मोलाचा आहे. विशेषतः नागरी क्षेत्रात या बॅंकेचा विस्तार मोठा आहे. मागील संचालक मंडळाच्या काळात बॅंकेत अनेक गैरव्यवहार पुढे आले. अखेर तत्कालीन पदाधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. बॅंकेवर प्रशासक आल्याने गैरव्यवहारांचा आणखी स्फोट झाला. मोठ्या गैरव्यवहांरामुळे रिझर्व्ह बॅंकेने ही बॅंक बंद करण्याच्या हालचाली केल्या. नंतर मात्र प्रशासकावर निभावले.

नवीन संचालक मंडळापुढे बॅंक वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. तब्बल ४६० कोटींची थकबाकी वसूल करण्याचे मोठे दिव्य आहे. ते पेलण्याची धमक दाखवत आपण बॅंकेला अडचणीतून बाहेर काढू, असे म्हणत दोन पॅनलने दंड थोपटले आहेत. ज्येष्ठ संचालकांचा मात्र बॅंक वाचविण्यासाठी तिळपापड होत आहे. अत्यंत कष्टाने मोठ्या केलेल्या बॅंकेला वाचवा, असेच आवाहन ते मतदारांना करीत आहेत.

‘त्यां’चा बॅंकेला नव्हे, स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न - राजेंद्र गांधी
२०१४ च्या जुन्या काही संचालकांना बरोबर घेऊन ही बॅंक वाचविण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत. बॅंक वाचली पाहिजे, हाच आमचा अजेंडा आहे. रिझर्व्ह बॅंकेने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, पुन्हा मिळालेल्या संधीचा फायदा करून देण्यासाठी आम्ही पॅनलच्या माध्यमातून रिंगणात आहोत. १५ सप्टेंबरची २०२० ची ऑर्डर झाल्यास अनेकांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे विरोधक बॅंकेला नव्हे, स्वतःला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. वसुली झाली तरच बॅंक वाचणार
आहे, असे मत बॅंक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी सांगितले.

बॅंकेला ऊर्जितावस्थेत आणू - सुवेंद्र गांधी
बॅंकेचे माजी अध्यक्ष (स्व.) दिलीप गांधी प्रणीत सहकार पॅनल पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवीत आहे. सर्व जागांवर दिग्गज उमेदवार देणार आहोत. सरोज गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार करीत आहोत. सर्व ठिकाणी आमचे स्वागत होत आहे. बॅंकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बॅंकेसमोर अनेक अडचणींचा डोंगर आहे तथापि, त्यातून संस्थेला बाहेर काढू, असे मत सहकार पॅनलचे प्रमुख सुवेंद्र गांधी यांनी व्यक्त केले.

बिनविरोध होणे गरजेचे होते - ॲड. अशोक कोठारी
नगर अर्बन बॅंक सर्वसामान्य व्यापाऱ्यांचा आधार आहे. काहींनी केलेल्या गैरव्यवहारामुळे बॅंकेवर प्रशासक नियुक्तीची नामुष्की आली. बॅंक वाचावी, हीच इच्छा आहे. जुन्या संचालकांनी तळमळीने ती मोठी केली. निवडणूक न लादता बिनविरोध करावी, असे आपले प्रयत्न होते. तथापि, काही लोकांमुळे ते फोल ठरले. काहीही करा, पण बॅंक वाचविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन बॅंकेचे माजी अध्यक्ष अॅड. अशोक कोठारी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT