Unopposed election stories in Parner taluka
Unopposed election stories in Parner taluka 
अहमदनगर

पारनेर तालुक्यात बिनविरोध निवडीची तऱ्हा ऐकली का?

मार्तंड बुचुडे

पारनेर ः तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यांपैकी नऊ बिनविरोध झाल्या, तसेच 189 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. मात्र, यात बिनविरोधसाठी अनेक युक्‍त्यांचा वापर करावा लागला.

काही ठिकाणी गावाला देणगी देऊन, काही ठिकाणी समोरच्या उमेदवाराने माघार घेण्यासाठी त्याचा खिसा भरून, तर काही ठिकाणी दमबाजी करून निवडणुका बिनविरोध झाल्याचे किस्से आता ऐकावयास मिळत आहेत. 

तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जमाघारीपर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या युक्‍त्यांचा वापर केला. त्यात काहींनी समोरच्या विरोधी उमेदवारास विनंती करून किंवा त्याचा झालेला खर्च देऊन व वेळ पडली तर काही ठिकाणी थोडा-फार धाकदपटशा करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले.

काही ठिकाणी बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांनी गावासाठी किंवा मंदिरासाठी देणगी स्वरूपात निधी द्यावा, असे ठरले व तो निधी त्यांनी ग्रामस्थांकडे जमाही केला आहे. 
अर्जमाघारीची मुदत संपल्यानंतरही, आपल्या विरोधातील उमेदवार अपक्ष असेल तर त्यास विनंती करून पाठिंबा देण्यास सांगितले जात आहे. मात्र, बिनविरोधसाठी झालेला खटाटोप अनेकांना आता खटकू लागला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT