Ahmednagar Rain sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Rain : अवकाळीचा तडाखा; घरे, फळबागांचे नुकसान

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विविध भागाला तडाखा दिला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. १४) झालेल्या अवकाळी पावसामुळे सहा जनावरे दगावली, २९ घरांचे नुकसान, तर डाळिंब, केळी, लिंबू, पपई या फळांचे ४१.४९ हेक्टरीवरील बागांचे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विविध भागाला तडाखा दिला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. १४) झालेल्या अवकाळी पावसामुळे सहा जनावरे दगावली, २९ घरांचे नुकसान, तर डाळिंब, केळी, लिंबू, पपई या फळांचे ४१.४९ हेक्टरीवरील बागांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने वेगवेगळ्या भागात तडाखा बसत आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. १४) झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोले, कोपरगाव आणि कर्जत या तीन तालुक्यांत नुकसान झाले आहे. कर्जत २०, कोपरगाव ४, श्रीगोंदे ३, तर पारनेर, पाथर्डी प्रत्येकी एका घराची अंशत: पडझड झाली आहे.

कोपरगावात दोन, तर जामखेडमध्ये एक अशी तीन मोठी जनावरे दगावली आहेत. कोपरगावात तीन लहान जनावरे मृत्युमुखी पडली. कर्जत तालुक्यात वीज पडल्याने एक गाय दगावली. कोपरगाव तालुक्यात एक गाय, एक बैल, तीन मेंढ्या वीज पडल्याने दगावल्या आहेत.

कर्जत, कोपरगाव, अकोले आणि श्रीगोंदे तालुक्यात फळबागा आणि शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कोपरगाव, कर्जत आणि अकोले तालुक्यातील प्रत्येकी चार, तर श्रीगोंदे तालुक्यातील एका गावातील नुकसान झाले आहे. फळबाग, शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा क्षेत्रावरील ४१.४९ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कोपरगाव २८.४१, कर्जत ८.२३, अकोले १.२०, श्रीगोंदे ३ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT