Ahmednagar Rain Update  Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Rain Update : अवकाळीचा अठरा घरांना तडाखा; वादळामुळे जिल्ह्यातील २६ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान

अकोले, राहाता तालुक्यातील अनेक गावांमधील झाडे उन्मळून पडले. वीज वाहक तारांवर झाडे पडल्याने अनेक गावातील वीज पुरवठा ठप्प झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : जिल्ह्यात रविवारी (ता.२०) अवकाळी पावसाचा सात तालुक्यांना तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे १८ घरांचे नुकसान तर २६ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. रविवारी सकाळपासून तापमानात वाढ जाणवत होती. सायंकाळनंतर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटास प्रारंभ झाला. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अकोले, राहाता तालुक्यातील अनेक गावांमधील झाडे उन्मळून पडले. वीज वाहक तारांवर झाडे पडल्याने अनेक गावातील वीज पुरवठा ठप्प झाला होता.

राहाता तालुक्यातील दहा घरांचे नुकसान झाले. काही घरांच्या छताचे पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. कच्या घरांचेही नुकसान झाले आहे. शेवगाव तालुक्यात चार, नेवासे दोन, जामखेड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील फळबागांचे नुकसान झाले आहे. आंबा, केळी, डाळिंब या फळबागांचे नुकसान जास्त आहे. श्रीगोंदे तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. २१. ५२ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले. कर्जत तालुक्यात ४.७ हेक्टर तर अकोले तालुक्यात १. १० हेक्टर क्षेत्रातील बागांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT