branch manager suicide esakal
अहिल्यानगर

‘अर्बन’ बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

गोरक्षनाथ बांदल

शेवगाव (जि.अहमदनगर) : बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेण्याच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५९) यांनी भातकुडगाव येथे स्वत:च्या शेतामध्ये मंगळवारी (ता.२७) दुपारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. काय घडले नेमके? (Urban-branch-manager-commits-suicide-marathi-news-jpd93)

गैरव्यवहाराचा चिठ्ठीत उल्लेख

भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे हे नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते काल सोमवारी बँकेच्या कामासाठी नगर येथे गेले होते. मंगळवारी (ता. २७) शेवगाव शाखेत न जाता घरीच थांबले होते. दुपारी तीनच्या सुमारास ते भातकुडगाव येथील त्यांच्या शेतात बेशुद्धावस्थेत कुटुंबीयांना आढळून आले. त्यांना शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांचे चुलत भाऊ कचरू तुकाराम शिंदे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत शिंदे यांच्या खिशात सापडलेल्या हस्तलिखित चिठ्ठी सापडली आहे..त्यात असे लिहिले आहे की...

गैरव्यवहाराचा चिठ्ठीत उल्लेख

मृत शिंदे यांच्या खिशात सापडलेल्या हस्तलिखित चिठ्ठीत, ‘बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण व्यवहारातील फसवणुकीत माझा काहीही संबंध नाही. बँकेने शाखेत नेमलेला गोल्ड व्हॅल्युअर सोन्याचे परीक्षण व मूल्यांकन करून दाखला देतो. त्यावर विश्‍वास ठेवून कर्जदारांना सोनेतारण मंजूर केले जाते. कर्जासाठी देण्यात आलेले सोने खातेदार, गोल्ड व्हॅल्युअर व शाखाधिकारी यांच्यासमक्ष सीलबंद करून त्यावर खातेदाराची व गोल्ड व्हॅल्युअरची सही घेऊन ती पिशवी शाखाधिकाऱ्याच्या ताब्यात दिली जाते. त्यामुळे यात माझा काहीही दोष नाही. गोल्ड व्हॅल्युअर व खातेदार यांनी बँकेची फसवणूक केलेली आहे. माझा यात काहीही दोष नाही. माझी फसवणूक झालेली असून, कृपया मला माफ करावे,’ अशा आशयाचा मजकूर आढळून आला आहे. या घटनेमुळे नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण गैरव्यवहारास वेगळे वळण लागले असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.

संचालकांकडून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ

शेवगाव शाखेतील सोने तारण गैरव्यवहार शाखा व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनी २०१८मध्ये उघडकीस आणला होता. त्यांनी याबाबत लेखी स्वरूपात बँकेच्या संचालकांना ही माहिती कळविली होती, तरीही त्यांनी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली. संचालक मंडळ आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, अशी प्रतिक्रिया अर्बन बँक बचाव कृतिसमितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation: मोठी बातमी! सर्व आगामी निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू; ३३ टक्के जागा राखीव ठेवणार, कुणी घेतला निर्णय?

Mumbai: मुंबईकरांना दिलासा! वडापाव-समोसा महागणार नाही; मध्य रेल्वेची मोठी अपडेट

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! तंदुरी रोटीच्या गोळ्याला थुंकी लावत असल्याचा व्हिडीओ समोर; मुंबईतील हॉटेलमधील प्रकार

Numerology : 'या' मुलांकाचे लोक नेहमी फक्त तुमचा फायदा उचलतात, पण तुमच्या संकट समयी मदत न करता पळ काढतात

Latest Marathi News Live Update : उदगीर येथील दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग

SCROLL FOR NEXT