वल्लभगड  sakal
अहिल्यानगर

सर्वात उंच भगव्या ध्वजाचे वल्लभगड येथे स्वागत

रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून खर्ड्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात जगातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार

राजेंद्र हजारे

निपाणी : कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून खर्ड्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात जगातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

खर्ड्याला मराठ्यांनी शेवटची लढाई जिंकली. या देदिप्यमान पराक्रमाची पताका डौलाने फडकत रहावी, यासाठी खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात शक्ती-भक्ती, एकता व समानतेचं प्रतीक असलेला ७४ मीटर इतका देशात सर्वांत उंच भगवा 'स्वराज्य ध्वज' उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र आणि भारतातील सर्व गडकिल्ले आणि इतर पवित्रस्थळी या ध्वजाचे स्वागत करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील वल्लभगड येथे या स्वराज्य ध्वजाचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते किल्ल्याच्या पायथ्याखालून वाजत गाजत हा स्वराज्य ध्वज किल्ल्यावर आणण्यात आला. येथे हनुमान मंदिर येथे मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, वल्लभगडचे गजानन साळुंखे, निपाणीतील प्रशांत नाईक, प्रा. डॉ. भारत पाटील, सुधाकर सोनालकर , दीपक वळीवडे, अरुण अवळेकर, स्वराज्य संघटनेचे संस्थापक नवनाथ चव्हाण, बाळासाहेब कमते, उत्तम कामते, संदीप येरुडकर, अतुल चावरेकर, अवधूत देशपांडे, ओमकार केसरकर, दिग्विजय पुंडे, वैभव मगदूम रुपेश तोडकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT