Vande Bharat Express
Vande Bharat Express sakal
अहमदनगर

Vande Bharat Express : वंदे भारतमुळे शिर्डीच्या विकासात भर

सकाळ वृत्तसेवा

दोन महिन्यांपूर्वी नागपूर ते शिर्डी हा समृध्दी महामार्गापाठोपाठ आज मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.

शिर्डी - दोन महिन्यांपूर्वी नागपूर ते शिर्डी हा समृध्दी महामार्गापाठोपाठ आज मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. साईंच्या शिर्डीच्या धार्मिक पर्यटनास या दोन्ही सुविधांमुळे चालना मिळू शकेल. समृध्दी महामार्गामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी वाढली आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसमुळे त्यात आणखी भर पडणार आहे. एका अर्थाने शिर्डीच्या विकासात महत्वाची भुमिका बजावणारे या दोन महत्वाच्या भेटी शिर्डीकरांना मिळाल्या आहेत.

ताशी एकशे तीस किलोमीटर वेगाने धावू शकणारी आणि संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेला सोळा डबे आहेत. एकाचवेळी अकराशे प्रवासी प्रवास करू शकतील. वायफाय सुविधा, वेग आणि पुढील स्थानकाची माहीती प्रवाशांना समोर दिसेल. मुंबई ते शिर्डी हे अंतर अवघ्या पाच तासात पूर्ण करेल. मुंबई येथून मोठ्या संख्येने येणाऱ्या साईभक्तांना ही वरदान ठरेल.

सध्या मुंबई, इगतपूरी, नाशिक आणि शिर्डी असे थांबे असले तरी भविष्यात आणखी थांबे दिले जाण्याची शक्यता आहे. दोन महिन्यापूर्वी मोदींच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या जलदगती महामार्गाचे उदघाटन झाले. या महामार्गामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय भर पडली. कोविडचे मळभ दूर झाल्यानंतर येथील भाविकांची गर्दी टिकून आहे.

त्यात या समृध्दी महामार्गामुळे भर पडल्याचे निरीक्षण येथील व्यावसायिकांनी नोंदविले आहे. शिर्डी ते मुंबई हा दुसरा टप्पा पूर्ण झाला की या गर्दीत आणखी वाढ होईल. शिर्डीच्या विकासाला चालना देणाऱ्या दोन महत्वाच्या सुविधांचे लोकार्पण गेल्या दोन महिन्यात मोदींच्या हस्ते करण्यात आले.

शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसचे अनोख गिफ्ट दिले आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनीधी या नात्याने मी पंतप्रधानांचे आभार मानतो.

- राधाकृष्ण विखे, महसूल मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून मेक इन इंडीयाचे स्वप्न साकार झाले. संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाडी मुंबई ते शिर्डी या रेल्वेमार्गावर धावू लागली. हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गा पाठोपाठ वंदे भारत एक्स्प्रेस हि शिर्डीच्या प्रगतीत भर घालणारी ठरणार आहे.

- सदाशिव लोखंडे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT