Vehicles with sand worth Rs 60 lakh seized in Parner 
अहिल्यानगर

पारनेरमध्ये ६० लाखांच्या वाळूसाठ्यासह वाहने जप्त, पोलिस-महसूलची कारवाई

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या तालुक्यातील नागापुरवाडीच्या डुबेवाडी येथील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यां विरोधात बुधवारी उशिरा केलेल्या कारवाईत सुमारे 70 ते 80 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. 

एक पोकलेन मशीन व दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले. यात एकूण 40 ते 50 लाखांचा अवैध वाळूसाठा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे वाळुतस्करांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील नागापुरवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व उपसा केला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी डूबेवाडी येथे अवैधरित्या पोकलेन मशिनच्या साह्याने वाळू काढली जात होती. कारवाईमध्ये पोकलेन मशीन तसेच दोन ट्रॅक्टर जप्त केले. हे सर्व वाहने वैभव बाळकृष्ण पायमोडे 
(रा.टाकळी ढोकेश्वर) याचे असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व एम.ए.नायब तहसीलदार माळवे यांनी ही कारवाई केली. संबंधित वाहने पंचनामा करून पारनेर पोलिस ठाण्यात आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पथकामध्ये पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, नायब तहसीलदार एम.ए.माळवे, सलगरे कामगार तलाठी शिरसाठ, एरंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे आदींचा समावेश होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT