Ventilator made by a quarantine youth in Jamkhed 
अहिल्यानगर

Video शाब्बास रे पठ्ठ्या ः हॉटस्पॉट जामखेडमधील क्वॉरंटाइन तरूणाने कोरोनाबाबत केलं हे संशोधन

वसंत सानप

जामखेड : कोरोनाने सर्व जगालाच वेठीस धरले आहे. भारतासह इतरही देश लॉकडाउन आहेत. त्यामुळे सर्व इंडस्ट्री बंद आहे. कोरोनापासून लोकांचे जीव वाचवायचे असतील तर त्यासाठी सर्वात मोठी गरज आहे ती व्हेंटिलेटरची. नगर जिल्ह्यातील जामखेड शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे ते शहर सील केले आहे. जे रूग्ण कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते. त्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले. लोकांना क्वॉरंटाइन केलं की भीतीने त्यांची गाळण उडते. नवनिर्मिती किंवा नवविचार ही फार दूरची गोष्ट मात्र, त्या वातावरणातही क्वॉरंटाइन केलेल्या एका युवकाने मोठं संशोधन केलं आहे. ज्याचा संपूर्ण देशाचा फायदा होऊ शकतो.
कोरोनाबाणीच्या परिस्थितीत COVID-19  या काळात देशाला Ventilator ची कमी भासू शकते. त्या दृष्टीकोनातून त्याने  Automatic Continuous positive airway pressure (CPAP) Ventilator Prototype तयार केले. यात नव्वद टक्के भंगार सामानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कमी खर्चात ते उपलब्ध होऊ शकते असा त्याचा दावा आहे.

काही electronic components जे Scrap मध्ये available नसते ते कमी आहे जर हे पार्ट आपल्याला उपलब्ध  झाले तर हे Ventilator अजून उत्कृष्टपणे काम करेल, असा त्याचा दावा आहे. या भयंकर परिस्थितीत लोकांच्या सेवेत आपले योगदान देता येईल, या प्रामाणिक भावनेतून मी माझी कल्पना प्रत्यक्षात उतरवली, असे सोहेल इब्राहिम सय्यद सांगतो.

तो विद्युत अभयांत्रिकीचा विद्यार्थी आहे. समासेवेची भावना त्याच्यात रुजू करणारे त्याचे मोठे चुलते इस्माईल भाई सय्यद जामखेड तलुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच  वडील इब्राहिम सय्यद हे व्यावसायिक आहेत. भाऊ साहिल सय्यद हा फार्मसीचा विद्यार्थी आहे.  

माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर पुणे येथील नामांकित MNC मध्ये Job करून स्वतः उद्योजक होऊन लोकांना रोजगार निर्माण करून द्यावा, या भावनेतून Wipz.in by Delux Enterprise या नावाने स्वतःच बांधकाम क्षेत्रात त्याने व्यवसाय सुरू केला. व्यवसायात चांगला प्रतसादही मिळाला. अवघ्या 3 महिन्यांत दिल्ली येथे बांधकाम क्षेत्रात उगवतं नेतृत्व म्हणून त्याला पुरस्कारही मिळाला.

सोहेलने बनविलेल्या या उपकरणाला  'JIVA' ( जीवन आणि वायु प्रदान करणारा ) हे नाव दिले आहे. 
या नावासोबत फक्त वैज्ञानिक भावनाच नव्हे तर महाराष्ट्राचे दैवत आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचवणारे शूर सरदार जीवा महाले यांच्या नावाने प्रेरीत होऊन हे नाव दिल्याचेही सोहेल सांगतो.

जीवाची उपयुक्तता

सोहेल सध्या जामखेड शहरात होम क्वॉरंटाइन आहे. त्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाही. या व्हेंटिलेटरच्या संशोधनात काही सुधारणा करायच्या आहेत. त्यासाठी त्याला सुट्या भागांची आवश्यकता आहे. परंतु लॉकडाउनमुळे ती पूर्ण होत नाही. हे उपकरण नक्कीच उपयोगी पडेल. परंतु तज्ज्ञांपर्यंत ते पोहोचयला हवे.

रोहित पवारांमुळे सोहेल शोध उजेडात

होम क्वॉरंटाइन असल्याने सोहेलचा शोध जगापर्यंत आलेला नाही. त्याला या उपकरणात सुधारणा करायची आहे. परंतु तो होम क्वॉरंटाइन असल्याने आणि जामखेड शहर सील असल्याने प्रत्येकाला कोरोनाची भीती आहे. त्यामुळे कोणाचे सोहेलच्या या संशोधनाकडे लक्ष गेले नाही. आमदार रोहित पवार यांना सोहेलच्या संशोधनाची माहिती समजली. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर सोहेलच्या संशोधनाचे कौतुक करीत व्हिडिओ पोस्ट केला. आता सोहेलच्या मित्रांनीही ती पोस्ट शेअर केली आहे. त्याला लाई्क्सही मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

Samsung Galaxy S24 Ultra मोबाईलवर चक्क 70 हजारचा डिस्काउंट; प्रीमियम ऑफर पाहा एका क्लिकवर

Political Astrology : अजित पवारांच्या मागची साडेसाती कधी संपणार? या महिन्यात होणार मोठा राजकीय बदल, जाणून घ्या भविष्य....

Asia Cup, IND vs PAK: मोदींना शेवटची संधी होती..उद्धव ठाकरे खवळले, महिला शिवसैनिक पंतप्रधानांना सिंदूर पाठवणार!

Latest Marathi News Updates : कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT