In view of the increasing number of corona patients in Ahmednagar, the Municipal Corporation has started two corona centers 
अहिल्यानगर

उषःकाल होता होता कोरोनाची काळी रात्र आली; महापालिकेची दोन कोविड सेंटर सुरू

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने दोन कोरोना सेंटर सुरू केली आहेत. यातील जैन पितळे बोर्डिंगमध्ये केवळ महिला रुग्णांवरच उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

अमृता फडणवीसांना रोहित पवार म्हणाले, ताई तुम्ही संधीचा योग्य फायदा घेतला
 
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमही सुरू आहे. तरीही रुग्णसंख्या आटोक्‍यात येत नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नटराज हॉटेल येथे 100 बेडची, तर जैन पितळे बोर्डिंग येथे 70 बेडची व्यवस्था केली आहे. मात्र, रुग्ण मोठ्या संख्येने घरीच उपचार घेत असल्याने, कोरोना सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण सध्या अतिशय कमी आहे.

नटराज हॉटेलमध्ये केवळ दोनच रुग्ण उपचार घेत आहेत. जैन पितळे बोर्डिंगमध्ये अद्याप रुग्ण आले नाहीत. महापालिकेकडे उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषधेही आहेत. महापालिकेने ही सेंटर सुरू करण्यासाठी त्यांची स्वच्छता व सॅनिटायझेशन केले आहे. बेड व अन्य सुविधांवर खर्च केला असला, तरी या सेंटरना रुग्णांची अद्याप प्रतीक्षा आहे. 

महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर भेट 

महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच महापालिकेने, फक्‍त महिलांवर उपचार केले जातील असे कोविड सेंटर जैन पितळे बोर्डिंग येथे सुरू केले. या सेंटरमध्ये 70 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

Virat Kohli: विराट कोहलीच्या नावाची जादू! लॉन्च होताच One8 चे 1.5 लाख शूज विकले; 24 तासांत कोट्यवधींची कमाई

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

SCROLL FOR NEXT