nagar 
अहिल्यानगर

असंघटीत कामगारांना रोजगार मिळवून द्यावा

अमित आवारी

अहमदनगर : शहरात कागद, काच, पत्रा गोळा करणाऱ्या असंघटीत कामगारांना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात समावेश करून त्यांना रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी कष्टकरी पंचायतीचे विकास उडाणशिवे यांनी केली आहे. यासंदर्भात उडाणशिवे यांनी आज महापालिका सहायक आयुक्‍त सचिन राऊत यांना दिले.
 
कागद, काच, पत्रा वेचणाऱ्यांसाठी कष्टकरी पंचायत अनेक वर्षांपासून काम करीत आहे. या कामगारांनी 'स्वच्छ भारत प्लॅस्टिक निर्मूलन' कार्यक्रमात सहभाग घेतला होता. नंतर महापालिकेने संघटनेच्या कामागारांना ओळखपत्र दिले. तसेच, 180 सभासदांना तीन वर्षांचा अपघातविमा संरक्षण शासनामार्फत देण्यात आले.

सध्या कचरावेचकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचा समावेश महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात करावा, अशी मागणी उडाणशिवे यांनी केली आहे. ज्योती शिंदे, शीतल शिंदे, मीना चांदणे, वनिता घोरपडे, लक्ष्मी भालेकर, मंगल घोरपडे, दीपाली घोरपडे, रेखा साळवे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT