Vikhe-Thorat's political quarrel 
अहिल्यानगर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लाचार... विखे-थोरातांची भाऊबंदकी उफाळली

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : नगर जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपातील आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय भाऊबंदकी उफाळूुन आली आहे. हे दोघेही एकाच पक्षात असतानाही त्यांच्यात सुंदोपसुंदी चालायची. आता तर ते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही  संधी सोडत नाहीत. आज विखे पाटील यांनी मंत्री थोरात यांच्यावर जहरी टीका केली.

राज्य सरकारमध्ये कॉंग्रेस नेते व मंत्र्यांना कुणी विचारत नाही. कॉंग्रेसचा एवढा लाचार प्रदेशाध्यक्ष आपण पहिल्यांदा पाहत आहोत, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

विखे पाटील म्हणाले, ""शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'तून "जुनी खाट' अशा शब्दांत कॉंग्रेसची खिल्ली उडवली. मात्र, तरीही कॉंग्रेसच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही. सरकारात त्यांना कुणी विचारतही नाही. मात्र, तरीही आम्ही समाधानी, असे ते म्हणत असतील, तर ते एक तर विनोद करीत असावेत किंवा सत्तेसाठी लाचार झाले असावेत. त्यांच्याकडे थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांनी सत्ता सोडावी. मात्र, त्यांच्याकडून तशी अपेक्षा करता येणार नाही.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Cancel: इस्रायल-इराण युद्धाचा फटका! पुणे-मुंबईहून परदेशी जाणारी विमाने रद्द; देशभरात विमानतळांवर प्रवासी अडकले

Pune Transport Strike: टोल, कर, ई-चलन धोरणाविरोधात पाच मार्चपासून बेमुदत आंदोलन

Agra STF Encounter: एसटीएफचा 'धडाका'! शार्पशूटर गुंडाचा आग्र्यात एन्काउंटर; १० वर्षांपूर्वी लुटलेली सरकारी पिस्तूल अखेर जप्त

Devotional Journey: शेगाव वारीचा अलौकिक अनुभव! डोळे भरून दर्शन घेताच जीवन कृतार्थ झालं

Niphad Online Ration Card : जुनी रेशनकार्ड इतिहासजमा; आता घराघरात ई-शिधापत्रिका, गैरव्यवहाराला बसणार पूर्ण आळा

SCROLL FOR NEXT