widows honored Sakal
अहिल्यानगर

वैधव्याच्या जखमेवर सौभाग्यलेण्याच्या भेटीने फुंकर

वटपौर्णिमेनिमित्त गावातील विधवांना सौभाग्याचे लेणे देऊन सन्मानित

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर - कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर तोच पॅटर्न राबविण्यासाठी राज्यातील अनेक गावे पुढाकार घेत आहेत. मात्र, पारनेर तालुक्यातील रांधे गावाने एक पाऊल पुढे टाकत हा कायदा, ठराव प्रत्यक्ष कृतीत आणला आहे. वटपौर्णिमेनिमित्त गावातील विधवांना सौभाग्याचे लेणे असणारा चुडा, कुंकवाचा करंडा, साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

रांधे गावाने याअगोदरच विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उपसरपंच संतोष काटे यांनी वटपौर्णिमेनिमित्त विधवा महिलांचा सन्मान करून, हा कायदा आपण कृतीत आणू, अशी संकल्पना गावासमोर मांडली. त्यास विनोद फापाळे, संतोष आवारी यांची साथ मिळाली व आज हा कार्यक्रम गावातील वटवृक्षासमोर पार पडला. गावातील विमल आवारी, हिराबाई चौधरी यांना चुडा, कुंकवाचा करंडा व साडीची भेट देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शंकुतला क्षीरसागर, वत्सला रोकडे, शायरा तांबोळी यांनी महिलांना हळद-कुंकू लावून चुडा व साडी देऊन सन्मान केला. सरपंच अरुण आवारी, उपसरपंच संतोष काटे, भगवान पावडे, अप्पासाहेब काटे, प्रमोद गायकवाड, अमोल शिंदे, अविनाश आवारी उपस्थित होते. या महिलांनीही आजपासून कुंकू लावून हिरव्या बांगड्या घालण्याचा निर्णय घेतला आहे.

विधवा प्रथाबंदीमुळे वैधव्य आलेल्या अनेक महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि सन्मानाची कळी खुलणार आहे. या निर्णयाने विधवांचे सौभाग्यालंकार कायम राहतील. ही प्रथा बंद झाल्यामुळे विधवांना धार्मिक कार्यात सहभागी होता येईल.

- विमल आवारी, एकल महिला.

कायदे, ठराव सगळीकडे होतात. मात्र विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृतियुक्त कार्यक्रम आवश्यक आहे. आज आम्ही गावातील विधवा महिलांना चुडा, कुंकवाचा करंडा, साडी देऊन सन्मान केल्याने हा कायदा आम्ही प्रत्यक्षात कृतीत आणून समाजास दिशा दिली आहे.

- संतोष काटे, उपसरपंच, रांधे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT