The villagers have caught the thief stealing a two-wheeler at Deswade  
अहिल्यानगर

देसवड्यात दुचाकी चोरणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील देसवडे येथे अज्ञात दुचाकी शेतात लावून ती परत घेऊन जाण्यासाठी आलेल्या चोराला ग्रामस्थांनी रस्त्यावर पकडले. आणि त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोपट नाथु भुतांबरे राहणार शिंदेवाडी तालुका संगमनेर असे त्याचे नाव आहे. सहाय्यक फौजदार शिवाजी नानाभाऊ कडूस यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहीती अशी की, गावातील संतोष कानडे, पंढरीनाथ भोर, गेनभाऊ कानडे, सुनिल गुंड असे एकत्र जमल्यानंतर शेतात लावलेली अज्ञात दुचाकी त्यांच्या निदर्शनास पडली त्यांना ही गाडी चोरीची असल्याचा संशय आला व ती कोणी नेण्यासाठी येत आहेत हे पाहण्यासाठी सर्वजण तेथेच थांबून राहिले. बुधवारी (ता.१८) रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसम यांनी सदरची गाडी मक्याच्या पिकातून मुख्य रोडवर घेऊन सुरु करत असताना गावातील संगीता संजीव भोर व रामा गुंड या दोघांनी त्यांना त्यांच्या नाव, गावाची विचारणा केली असता पोपट नाथु भुतांबरे व पिंटु दुधावडे असे सांगितले.

सदरचे गाडीबाबत विचारणा केली असता त्यांनी ही गाडी चोरीची असलेली सांगितले व ती गाडी विक्रीसाठी आलेलो आहोत असे कळविले. सदरची गाडी ही चोरीची असल्याचे समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करा असे म्हटले. या नंतर चोरांसोबत झटापट झाली असता पिंटु दुधावडे यांने संगीता संजीव भोर यांचे पोटामध्ये हाताने बुक्की मारत अंधाराचा फायदा घेत त्याने तिथून पोबारा केला. मात्र यातील पोपट भुतांभरे यांस ताब्यात घेण्यात आले आहे.

दुचाकी व शेती पंप चोरीचे मोठे रॅकेटची शक्यता

देसवडे परिसरात दुचाकीसह शेतीपंपाची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. येथील चो-या या चोरांनी केली असल्याची शक्यता आहे. दुचाकी व शेतीपंपाचे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणी जलदगतीने तपास करावा. 
- संजीव भोर- अध्यक्ष, शिवप्रहार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT