Water of Kukdi canal in Shrigonda taluka 
अहिल्यानगर

श्रीगोंदा तालुक्यात अखेर कुकडीचे पाणी

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : कर्जत व करमाळा हद्दीत पाणी जास्त गतीने जात असले, तरी पायथ्याचे नियोजन होत नाही तोपर्यंत श्रीगोंद्याच्या हद्दीत पाणी देऊ नका, या अधिकाऱ्यांच्या आदेशाला निसर्गामुळे हरताळ फासला गेला. पारनेर व श्रीगोंद्याच्या कुकडी लाभक्षेत्रात शनिवारी (ता. 13) चांगला पाऊस झाला. वाढलेल्या पाण्यामुळे कालवा फुटण्याची शक्‍यता गृहीत धरून, शेवटी श्रीगोंद्याच्या हद्दीतही आवर्तनाचे पाणी सुरू करावे लागले. 

"कुकडी'चे आवर्तन सुरू करते वेळी श्रीगोंद्यातील बेकायदा पाइप काढण्याची मोहीम झाली. त्यानंतर कर्जत-करमाळा होईपर्यंत श्रीगोंद्याच्या हद्दीत अजिबात पाणी घेऊ नये, अशी सक्त तोंडी सूचना वरिष्ठांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. लेखी पत्रही दिल्याचे समजते. मात्र, पहिले चार दिवस पारनेर व पुणे जिल्ह्यात बिनधास्त पाणीचोरी सुरू राहिल्याने श्रीगोंदेकरांनी संताप व्यक्त केला. 

"सकाळ'ने हे सगळे आकडेवारीत मांडल्याने, वरच्या भागातील चोरी बंद करून बहुतेक पाणी खाली काढण्यात आले. इतिहासात पहिल्यांदाच कर्जतच्या हद्दीत 875 क्‍यूसेकने पाणी कालव्यातून वाहिले. मात्र, त्याच वेळी शनिवारी "कुकडी'च्या भागात चांगला पाऊस झाला. वाढलेल्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन शेवटी पायथा ते माथा नियम बाजूला ठेवला गेला आणि श्रीगोंद्याच्या हद्दीतील वितरिका क्रमांक 132ला पाणी सोडण्यात आले. 
 

कालव्यातून पाण्याची गती चांगली मिळत असल्याने, कर्जत-करमाळ्यासोबतच श्रीगोंद्यातील काही भागाचे आवर्तन सुरू करा, असा आदेश वरिष्ठांकडून आला. त्यामुळे शनिवारी रात्री 132 क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडले. 
- स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Latest Marathi News Live Update : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीत

Hacking Safety Tips : हॅकर्स करणार गुन्हा अन् तुम्ही जाल तुरुंगात! घरातली 'ही' स्वस्त वस्तु तुम्हाला बनवत आहे अपराधी? आजच करा चेक

तुझी जात काय? भर सेटवर अभिनेत्याने विचारला प्रश्न; 'अग्गंबाई सुनबाई' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली-

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

SCROLL FOR NEXT