Water Source 
अहिल्यानगर

Water Source : पठारी भागातील बारमाही वाहणारा नैसर्गिक झरा; अनेक कुटुंबांची भागते तहान

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील दुर्गम ठिकाणी असलेल्या हिवरगाव पठार अंतर्गतच्या पायरवाडी परिसरातील बारमाही नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे या वाडीसह अनेक कुटूंबाची पिण्याच्या शुध्द पाण्याची गरज भागते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही सुविधा अद्यापही वापरात आहे.

हिवरगाव पठार या गावांतर्गत पायरवाडी, सुतारवाडी, गिऱ्हेवाडी, दगडसोंड वाडी, कोळेवाडी व शेंगाळवाडी या सहा छोट्या वाड्या आहेत. या सर्व वाड्यांमध्ये ठाकर या आदिवासी समाजाची एकूण लोकसंख्या केवळ हजार ते अकराशे आहे.

हिवरगाव पठार पासून रस्त्याने पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पायरवाडी या वाडीलगत घाटमाथ्यावर सुमारे ३०० मीटर अंतरावर खडकातील कपारीतून बारमाही वाहणारा जिवंत पाण्याचा झरा गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.

उन्हाळ्यातही या झऱ्याचे पाणी केवळ कमी होते, पूर्ण आटत मात्र नाही. कपारीतून पाझरणारे पाणी लगतच्या खोलगट खड्ड्यात साचते. ते लहान भांड्याने भरुन घेतले जाते. मागील काही वर्षांपूर्वी या वाड्या वस्त्यांसाठी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु होते. या गावासाठी शासनाच्या योजनेतून पिण्याच्या पाण्याच्या दोन योजना व पाईपलाईनसह उंच पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत.

या पैकी पहिली योजना २००५ - २००६ साली मागासवर्गिय क्षेत्रासाठीच्या पाणीपुरवठा योजनेतून हिवरगाव जवळच्या उंच पठारावर ३५ हजार लिटर्स क्षमतेची उंच टाकी बांधण्यात आली. तर २०११ - २०१२ सालच्या भारत निर्माणच्या योजनेतून माळवाडी गावठाणात ५० हजार लिटर्स क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे.

या दोन्ही योजनांसाठी गावठाणात भरपूर पाणी असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीच्या उद्भवाचा वापर करण्यात येतो. सहा वाड्यांसाठी साडेचार हजार फुटांची पाईप लाईन करुन या वाड्यांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र कमी व्होल्टेज, विजपंप जळणे किंवा पाईप लाईन फुटणे यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्यास या परिसरातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज हाच झरा भागवतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil Video: ''..अन् माझ्यासमोरच कसाब खो-खो हसायला लागला'', विश्वास पाटलांनी सांगितला कोर्टरुममधला अनुभव

Big Breaking : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय अन् टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी जाणार; ६ सामन्यांच्या तारखा जाहीर

Rahul Gandhi on Indore Contaminated Water: "इंदुरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही, विष दिलं गेलं अन् प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत राहिलं"

Kolhapur Election : डमी उमेदवारांचे ४८ अर्ज माघार; आज अखेरचा दिवस, कोल्हापूरमध्ये गर्दी-तणावाची शक्यता

Kolhapur Politics : घारीच्या तोंडावर कोल्हापूरमध्ये पाळत, पाठलाग अन् दबावतंत्र; राजकीय रणधुमाळी शिगेला

SCROLL FOR NEXT