The water storage pond at Shrirampur will be lined 
अहिल्यानगर

पाणीसाठवण तलावाचे अस्तरीकरण होणार

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरातील मिल्लतनगर येथील पाणीसाठवण तलावाच्या अस्तरीकरणाची मागणी आमदार लहू कानडे यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यांनी शिफारस करून जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे लवकरच निधी उपलब्ध होऊन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या अस्तरीकरणाचे काम मार्गी लागेल.
 
वाढते शहरीकरण व लोकसंख्यावाढीचा विचार करता, पाणीसाठवण तलावाची क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोद संजय फंड, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक श्रीनिवास बिहानी, मुजफ्फर शेख यांनी या निर्णयाचे स्वागत केले. आमदार (स्व.) जयंत ससाणे यांच्या पुढाकारातून नगरपालिकेच्या पाणीसाठवण तलावाचे खोलीकरण व कॉंक्रिटीकरण झाले.

त्यानंतर मिल्लतनगरमधील तलावाचे खोलीकरणही झाले. त्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढून पाण्याबाबतीत शहर स्वयंपूर्ण झाले. मात्र पाण्याची गळती रोखण्यासाठी तलावाचे अस्तरीकरण होणे गरजेचे होते. ते आता होणार असल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार कानडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT